शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवस शोधत होते ते बहिणीचा मृतदेह

By admin | Updated: August 6, 2014 23:15 IST

माळीण दुर्घटनेला आठवडा झाला, तरी अनेक जण नातेवाइकांचा शोध घेत आहेत. 145 मृतदेहांचे शवविच्छेदन झाले असले, तरी काहींची ओळख अद्याप पटलेली नाही.

मंचर : माळीण दुर्घटनेला आठवडा झाला, तरी अनेक जण नातेवाइकांचा शोध घेत आहेत. 145 मृतदेहांचे शवविच्छेदन झाले असले, तरी काहींची ओळख अद्याप पटलेली नाही. आसाणो येथील पुरुषोत्तम रामचंद्र ढवळे यांच्या बहिणीचे कुटुंब ढिगा:याखाली सापडले. 6 जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून, ओळखही पटली आहे. बहीण तानूबाई (वय 69) व तिचा नातू सागर (वय 7) यांचे मृतदेह मिळालेले नाहीत, अशी माहिती ढवळे यांनी दिली. बुधवारी सकाळी ते परिसरात स्वत:च शोध घेत होते. अधिका:यांकडे विचारपूस करीत होते.
काही दिवसांपूर्वीच पुरुषोत्तम ढवळे बहिणीला भेटून गेले होते. घटना घडल्यानंतर आजर्पयत त्यांनी अनेकदा माळीण येथे हेलपाटे मारले. आजही हातात छत्री घेऊन ते दोन किलोमीटर अंतर पायी चालून बहिणीचा मृतदेह शोधण्यासाठी आले होते. शाळेसमोरील टाकीवर उभे राहून ते हताश नजरेने घटनास्थळाकडे पाहत होते. ते जिवंत असण्याची आता आशा नाही; निदान त्यांचे मृतदेह तरी मिळावेत, असे ढवळे म्हणाले. बहिणीच्या घरात ती स्वत:, सून भारती, गोरक्ष पोटे, 3 लहान मुली व मुलगा, असे सहा जण होते. सर्व जण गाडले गेले. इतरांचे मृतदेह मिळाले; मात्र बहीण तानूबाई व तिचा नातू सागर यांचे मृतदेह मिळाले नसल्याचे ढवळे म्हणाले. 
गावातील मंदिरालगतच बहिणीचे घर होते. अडीवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन अनेक मृतदेह पाहिले. मात्र, बहीण व तिचा नातू यांचे मृतदेह सापडले नाहीत. माझी मुले पुणो येथून येऊन त्यांनीही शोधाशोध केली, असे पुरुषोत्तम ढवळे म्हणाले. त्यांनी तेथील अधिका:यांशी संपर्क साधला. ढवळे यांना अनेक जण धीर देत होते. अनोळखी मृतदेह समजून त्यांना अग्नी देण्याअगोदर मला मृतदेह मिळावेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.(वार्ताहर)