शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

हद्दीच्या वादातून मृतदेह नऊ तास रुळावर होता पडून

By admin | Updated: September 5, 2016 22:06 IST

चालत्या रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झालेल्या वृध्दाचा मृतदेह केवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वादावरून तब्बल नऊ तास रेल्वे रुळावर पडून होता.

ऑनलाइन लोकमत उस्मानाबाद, दि. ५ -  चालत्या रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झालेल्या वृध्दाचा मृतदेह केवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वादावरून तब्बल नऊ तास रेल्वे रुळावर पडून राहिल्याचा प्रकार पुणे-सोलापूर मार्गावरील कुर्डूवाडीनजीक घडला. यामुळे पोलिस प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा येथील रुकसेन कृष्णा बडे हे त्यांच्या नातेवाईकांसह तोरंब्याकडे येण्यासाठी पुणे-सोलापूर या पॅसेंजर रेल्वेने २८ आॅगस्ट रोजी (रविवारी) दौंडवरून निघाले होते. गाडीत फारशी गर्दी नसल्याने बहुतांश प्रवाशांना झोपेसाठी जागा मिळाली होती. पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही रेल्वे कुर्डूवाडी जंक्शनवर पोहोंचली. तेथे स्थानकावर चहा विक्रेत्याने रेल्वे डब्यात येवून काहींना चहाही दिला.

मात्र, जाताना रेल्वेचे दार त्याच्याकडून उघडे राहिले. सव्वाचारच्या सुमारास रुकसेन बडे (वय ६५) हे बाथरूमला जाण्यासाठी निघाले. मात्र, झोपेत असलेल्या बडे हे बाथरूमचा दरवाजा समजून रेल्वे डब्याच्या दरवाजाकडे गेले आणि धावत्या रेल्वेतून खाली पडले. हा प्रकार एका सहप्रवाशाने पाहिल्यानंतर त्यांनी अन्य प्रवाशांना व बडे यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. काहींनी रेल्वेची आपत्कालीन चैन खेचल्यानंतर घटनास्थळापासून जवळपास तीन किमी अंतरावर जावून ही रेल्वे थांबली. 

रेल्वेतील बडे यांच्या नातेवाईकांनी सदर अपघाताची माहिती रेल्वेच्या संबंधितांना दिल्यानंतर रेल्वे चालकाने नजीकच्या वडसिंगा स्टेशन मास्तरशी संपर्क साधला. त्यांनी दोन गार्ड सोबत देवून नातेवाईकांना घटनास्थळाकडे पाठविले. मात्र, तेथे गेल्यानंतर सदर अपघाताची जागा आमच्या हद्दीत नसल्याचे रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगत आपण कुर्डूवाडी पोलिस स्टेशनला जावून तेथे घटनेची नोंद करा, असे सूचविले. यावरून हे नातेवाईक कुर्डूवाडीत पोहोंचले.

मात्र, तेथेही पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी रेल्वेकडून सदर घटनेची नोंद असलेले पत्र आणण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यामुळे या नातेवाईकांनी वडसिंगे रेल्वे स्थानक गाठून तेथून हे पत्र घेतले व पुन्हा कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गेले. तेथे गेल्यानंतर कुर्डूवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पंचनाम्यासाठी आले. मात्र, त्यांनीही हद्दीचाच मुद्दा उपस्थित करीत हे घटनास्थळ माढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथे जावून घटनेची नोंद करा, असे सांगितले.

यानंतर हे नातेवाईक माढा पोलिस ठाण्यात गेले. तेथे सपोनि पालकर यांना घटना सांगितल्यानंतर त्यांनी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घटनास्थळी येवून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी माढा येथील रुग्णालयात पाठविला. तेथेही शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे दुपारी तीन वाजेच्या सुमारास शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.पुणे-सोलापूर पॅसेंजरमधून पडून काकांचे अपघाती निधन झाल्यानंतर पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या मुद्यामुळे मृतदेह तब्बल नऊ तास रेल्वे रूळावर पडून होता. अपघातप्रसंगी संबंधित यंत्रणेकडून तातडीने मदत व सहकार्य मिळणे अपेक्षित असते. मात्र, नियमावर बोट ठेवल्यामुळे लोकांची हेळसांड होते. हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा. - शीला बडे, सोलापूर