शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात कामासाठी गेलेला बोबन बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 02:04 IST

सुधागड तालुक्यातील मुळशी कातकरवाडीतील बोबन (बबन)शंकऱ्या हिलम हा तेलंगण राज्यातील बोरगाव चौक येथील कोळसाभट्टीवर पत्नी व मुलासह कामाला गेला होता.

अलिबाग : सुधागड तालुक्यातील मुळशी कातकरवाडीतील बोबन (बबन)शंकऱ्या हिलम हा तेलंगण राज्यातील बोरगाव चौक येथील कोळसाभट्टीवर पत्नी व मुलासह कामाला गेला होता. गतवर्षी नोव्हेंबर २०१६ पासून तो बेपत्ता झाला. त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने त्यांचा शोध करावा, अशी मागणी करणारे निवेदन त्यांची पत्नी पात्री बोबन हिलम, वडील शंकऱ्या भिवा हिलम व मुलगा दुऊ याचे निवेदन, शनिवारी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे देण्यात आले. बोबन शंकऱ्या हिलम यांचा तपास करण्याचे आदेश दिल्याचे अनिल पारसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बोबन मुळशी कातकरवाडीत राहणारा कातकरी आहे. त्याला सात मुले असून त्याच्याबरोबर त्याचे वडील शंकऱ्या, पत्नी पात्री हिलम आणि त्याची मुले राहतात. बोबन सप्टेंबर २०१६मध्ये कामासाठी तेलंगणा राज्यातील बोरगाव चौक येथील कोळसाभट्टीवर गेला होता. त्याची पत्नी पात्री हिलम व त्यांचा एक मुलगाही होता. मात्र बोबन नोव्हेंबर २०१६पासून गायब झाल्याचे, पात्री ही जानेवारी २०१७मध्ये घरी मुळशीवाडीत आली, तेव्हा तिने घरच्यांना सांगितले. मुळशीवाडीतील ग्रामस्थ गुरुवारी जांभूळपाडा येथील पोलीसचौकीत बोबन बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यासाठी गेले. मात्र, तुम्हाला तेलंगणमधील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी लागेल,असे सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर रिसर्च, ट्रेनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’या संस्थचे अजिंक्य हर्डिकर आणि रामदास थोरात यांच्या हा प्रकार लक्षात येऊन त्यांनी पोलिसांची मदत घेतली. (प्रतिनिधी)बेपत्ता झालेल्या बोबन(बबन) हिलमच्या शोधाकरिता प्रयत्न सुरू आहेत. माझे काही आयपीएस बॅचमेट तेलंगण राज्यात पोलीस अधीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांच्याशी थेट संपर्क साधून सहकार्य घेण्यात येईल.- अनिल पारसकर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक

रायगड पोलिसांच्या सहकार्याने बोबन (बबन) हिलमचा शोध नक्की लागेल, यात शंका नाही. -डॉ. चंद्रकांत पुरी, संचालक, मुंबई विद्यापीठ राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र