शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

बोर्डाच्या तपासनिसांचे मानधन अवघे पाच रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 04:20 IST

वर्षानुवर्षे दहावी-बारावीच्या विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे.मात्र, या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात गेली दहा वर्षे एक रुपयाचीहीवाढ झालेली नाही

प्राची सोनवणे, नवी मुंबईवर्षानुवर्षे दहावी-बारावीच्या विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे.मात्र, या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात गेली दहा वर्षे एक रुपयाचीहीवाढ झालेली नाही. शिक्षकांवरील ताण दिवसेंदिवस वाढत असला, तरी एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी दहावी बोर्डाच्या तपासनिसाला अवघे सव्वा चार रुपये, तर बारावीच्या तपासनिसाला ५ रुपये मानधन दिले जाते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासण्याचे जबाबदारीचे काम शिक्षकांवर सोपविले जाते. बोर्डाच्या परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता शासनाकडून भरमसाठ पैसा खर्च केला जातो.

दहा दिवसांत बोर्डाचे पेपर तपासण्याचा नियम करण्यात आला असून, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी आग्रह धरणारे शासन तपासनिसांच्या समस्यांकडे कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास येते. फेब्रुवारी-मार्च २०१७ रोजी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला दहावीच्या जवळपास ३ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत, तर बारावीच्या परीक्षेकरिता ३ लाख ३० हजार,७०८ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहे.

मागील वर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेकरिता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्याकरिता एकूण १५ हजार,९६६ तपासनीस आणि २६९९ मॉडरेटर होते, तर बारावी बोर्डाच्या परीक्षेला सर्व विषयांचे मिळून ७ हजार ६९३ तपासनीस आणि १५८१ मॉडरेटर होते.