शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरुंना वाचविण्याचा परीक्षा मंडळाचा प्रयत्न

By admin | Updated: June 10, 2014 01:06 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा परीक्षा मंडळ कुलगुरुंना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हितसंबंध जोपासण्याकरिता विद्यापीठाच्या कायद्याची पायमल्ली केली जात आहे,

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा परीक्षा मंडळ कुलगुरुंना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हितसंबंध जोपासण्याकरिता  विद्यापीठाच्या कायद्याची पायमल्ली केली जात आहे, असा आरोप सिनेटचे माजी सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी पत्र परिषदेतून केला आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या  परीक्षा मडंळाने कुलगुरु निर्दोष असल्याचा अहवाल पारित केला. यासंदर्भात दिनेश सूर्यवंशी यांनी आक्षेप  नोंदविला आहे. त्यांनी आरोपात म्हटले की, परीक्षा मंडळाने गठित केलेल्या ३२(६) समितीच्या अहवालातील निष्कर्ष व शिफारसी दोन्ही परस्पर  विरोधी असून समितीने स्वत:च काढलेल्या निष्कर्षांना केराची टोपली दाखवत कुलगुरुंचा अर्मयाद बचाव केला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थेमधील  घटकच कायद्याच्या तरतुदींना पायदळी तुडवीत असल्याचा आरोपीही सूर्यवंशी यांनी केला. कुलगुरुंनी आपल्या  मुलीचे गुण वाढविण्यासाठी  अधिनस्थ अधिकारी-कर्मचारी व शिक्षक यांचा वापर केल्याचे ३२(६) कमिटीच्या निष्कर्षाहून उघड होत आहे. एकीकडे अध्यादेश क्रमांक  ६६/२0१0 चे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष काढायचा व दुसरीकडे या उल्लंघनावर आधारित शिफारस करताना ‘हे असे गैर नाही’,असे म्हणायचे  असा गैरप्रकार चालविला आहे. घोम यांच्या बयाणात कुलगुरु कन्या त्यांच्या कार्यालयात आली म्हणून मी उत्तर पत्रिका बाहेर काढल्या, असे नमुद  आहे. मात्र समिती म्हणते, की हे जरी सत्य असले तरी कुलगुरुंची मुलगी कार्यालयात जाणे म्हणजे दबाव येत नाही व नियमांचे उल्लंघन होत नाही.  डुडुल हे मृणाल खेडकर हिचे पी.एच.डी.चे मार्गदर्शक असताना त्यांनी पुनर्मूल्यांकनाची जबाबदारी स्वीकारणे हेच मुळात आक्षेपार्ह वर्तन आहे, असे  सूर्यवंशीचे मत आहे. कुलगुरु महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यास असर्मथ आहेत. तसेच मुलींच्या  उत्तरपत्रिका तपासतात, अनावश्यक व्यावसायिक संबंधाचा वापर करीत असल्याचे ३२(६) च्या अहवालात स्पष्ट होत आहे. त्यामुळे कुलगुरुंना  तत्काळ निष्कासित करण्यात यावे, अशी मागणी दिनेश सूर्यवंशी यांनी केली आहे. विद्यार्थी हिताचा, कायद्यातील तरतुदीचा अपमान करणार्‍यांना आता  धडा शिकविणार असल्याचेही सूर्यवंशी म्हणाले. यासाठी आंदोलनाची तयारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेमध्ये अनिरुध्द  महाजन, तेजस्वी बारब्दे, कोमल राऊत आदींनी विद्यापीठाकडून होणार्‍या अन्यायाविरोधात लढा देण्याचे ठरविले आहे.