शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर आता बोर्डाचा वॉच

By admin | Updated: April 22, 2017 03:13 IST

बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याने, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची डोकेदुखी वाढली होती, पण आता दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्यामुळे मंडळातर्फे

मुंबई : बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याने, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची डोकेदुखी वाढली होती, पण आता दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्यामुळे मंडळातर्फे उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे. यासाठी विशेष अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. दहिसर येथील इस्त्रा शाळेतून दहावीच्या तीन विषयांच्या तब्बल ४१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. पोलिसांच्या शोधमोहिमेत ३१६ उत्तरपत्रिका सापडल्या आहेत. तथापि, अन्य १०० उत्तरपत्रिकांचा शोध अजूनही सुरूच आहे. चोरीला गेलेल्या उत्तरपत्रिकांचे प्रकरण लक्षात घेऊन, मंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसरमधील उत्तरपत्रिका चोरी प्रकरणात सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेतली नसल्यानेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उत्तरपत्रिका ठेवलेल्या केंद्रावर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांचा चमू पाहणी करणार असल्याचे मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. सापडलेल्या उत्तरपत्रिकांची विशेष तपासणी वाशी कार्यालयात सुरू आहे. या उत्तरपत्रिकांमध्ये काही बदल केले आहेत का, याची तपासणी करण्यात येणार आहे. शिक्षक वाशी कार्यालयात येऊनच ही तपासणी शिक्षक करत आहेत. दहिसर प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मंडळाकडून समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)