शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘महानंद’चे संचालक मंडळ बरखास्त होणार

By admin | Updated: September 5, 2015 01:52 IST

गैरव्यवहारांच्या आरोपामुळे वादात सापडलेले राज्य सहकारी दूध उत्पादक संघ (महानंद) संचालक मंडळ येत्या दोन-तीन दिवसांत बरखास्त करण्यात येईल

मुंबई/जळगाव : गैरव्यवहारांच्या आरोपामुळे वादात सापडलेले राज्य सहकारी दूध उत्पादक संघ (महानंद) संचालक मंडळ येत्या दोन-तीन दिवसांत बरखास्त करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल व दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, खडसे यांच्या घोषणेपूर्वीच महानंदच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिलेला राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.‘महानंद’च्या संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप होते. या आरोपांची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात आली आहे. त्यात तथ्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला जाणार खडसे यांनी सांगितले. दूध संघांनी महानंदला दूध न देणे, महानंदच्या पैशाने विदेश दौरे करणे व त्याचा हिशेब सादर न करणे, खरेदी व्यवहारातील गैरप्रकार, दूध भुकटी प्रकल्पाचा पांढरा हत्ती अशा विविध प्रकरणांकरिता लेखापरीक्षण अहवालात ठपका ठेवण्यात आला असल्याचे समजते.(लोकमत न्यूज नेटवर्क).................नागवडे यांचा राजीनामामहानंदच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी गोरेगाव येथे झाली. अध्यक्षा नागवडे यांनी अलीकडेच आपला राजीनामा सादर केला होता. हा विषय संचालक मंडळाच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर होता. त्यांचा राजीनामा मंजूर करून अध्यक्षांचे अधिकार नव्या व्यक्तीची निवड होईपर्यंत महानंदचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला. .........................................................................................................मार्केटिंग फेडरेशनही ‘रडार’वरमहाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या कामकाजातही गोंधळ आहे. या संदर्भात आपणाकडे तक्रारी असून त्यावरही बरखास्तीची कारवाई केली जाणार असून प्रशासकीय मंडळ स्थापन केले जाईल, असेही खडसे यांनी सांगितले.