शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा मंडळाचे संचालक नेटके यांचा राजीनामा

By admin | Updated: May 20, 2017 01:11 IST

साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची जबाबदारी मराठवाड्यातील प्रत्येक नागरीकाची आहे; माझी नव्हे, असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

- लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची जबाबदारी मराठवाड्यातील प्रत्येक नागरीकाची आहे; माझी नव्हे, असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ही जबाबदारी पत्रकार परिषदेत झुगारून लावली. या प्रकरणात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थी हे शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी उत्तरपत्रिका सोडवत असताना गुन्हे शाखेने छापा टाकून पकडले. या घटनेच्या तिसऱ्या दिवशी विद्यापीठात दाखल झालेले कुलगुरू डॉ. चोपडे यांनी या प्रकरणात अनेक निर्णय घेतले. ज्या प्रकरणाने विद्यापीठाची देशभरात बदनामी झाली त्याचे प्रमुख म्हणून आपण या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारणार का असा थेट प्रश्न ‘लोकमत’ प्रतिनिधीने विचारताच कुलगुरू गांगरले. आणि ‘माझी कशी असेल? ही जबाबदारी मराठवाड्यातील नागरिकांची, विद्यार्थी, संस्थाचलकांची आणि तुमची सुद्धा आहे’ असे म्हणत त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. मग साई इंजिनिअरिंगमध्ये घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला असता, त्यास परीक्षा विभागच जबाबदार ठरतो, असे त्यांनी मान्य केले.