मुंबई : मुंबई विद्यापीठातील बॅचलर आॅफ मास मीडिया (बीएमएम) अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेत ८१.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे परीक्षा विभागाने सांगितले.परीक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीएमएमच्या सहाव्या सत्रासाठी एकूण ३ हजार ८५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ हजार ८३२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले, तर २२ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ओ, ए, बी, सी, डी, ई, अनुत्तीर्ण, आरएलई, आरसीसी अशा ग्रेड पद्धतीने गुणांकन दिले जाते.केवळ तीन विद्यार्थ्यांना ओ ग्रेड मिळाला आहे, तर ६१८ विद्यार्थ्यांना ए, ८८९ विद्यार्थ्यांना बी, ८४१ विद्यार्थ्यांना सी, ४०८ विद्यार्थ्यांना डी आणि ४२ विद्यार्थ्यांना ई ग्रेड मिळाला आहे. ६४७ विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. शिवाय ३८४ विद्यार्थ्यांना आरएलई व सात विद्यार्थ्यांना आरसीसी ग्रेड देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
बीएमएमचा निकाल ८१ टक्के
By admin | Updated: June 11, 2016 04:19 IST