शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुंबई महापालिकेने द्यावेत पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:24 IST

राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, कर्जमाफीसाठी सरकारला पैसे लागणार आहेत, सरकार कुठून तरी कर्जाने रक्कम उभी करणार आहेच.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, कर्जमाफीसाठी सरकारला पैसे लागणार आहेत, सरकार कुठून तरी कर्जाने रक्कम उभी करणार आहेच. त्यापेक्षा मुंबई महापालिकेकडे ज्या ६० हजार कोटींच्या ठेवी आहेत, ते पैसे कर्जमाफीसाठी देऊन शिवसेने बाणेदारपणा दाखवावा. बाळासाहेबांना जेवढे डोक्यावर घेतले नसेल त्यापेक्षा जास्ती ग्रामीण भागातील जनता उध्दव ठाकरेंना डोक्यावर घेईल, अशी जोरदार फटकेबाजी राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.शिवसेनेने २०१७ पर्यंत कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. तोच धागा पकडून पवार म्हणाले, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. तुम्ही २०१७ पर्यंत कर्जमाफी करण्याचा ठराव विधानसभेत आणा, तुम्ही ६२ आहात आम्ही ८३ आहोत, सगळे मिळून १४५ होतात. आपण ठराव मंजूर करु. नुसतं बोलता कशाला, कृती करा, असे सांगून पवार यांनी कोणी कुठे ढोल बडवावेत की हलग्या वाजवाव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे, उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आहे.स्वत:च्याच बँकेपुढे जाऊन शिवसेनेने ढोल वाजवले. आता काय म्हणावं यांना, असे ते म्हणताच सभागृहात हशा पिकला. शिवसेनकडून यावर कोणीही उत्तर दिले नाही.कर्जमाफीच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाने आणलेल्या ठरावावर पवार बोलत होते. शिवसेनेने हे ३० हजार कोटी रुपये देताना त्यांना बँकांकडून जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज त्यांनी सरकारकडून घ्यावे, त्यामुळे सेनेला फरक पडणार नाही, नको तिथं जाऊन ढोल बडवण्यापेक्षा काही चांगलं काम करा, अशी कोपरखळीही पवार यांनी मारली.