शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमध्ये तीन महापालिका करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:28 IST

दिल्लीच्या धर्तीवर मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करण्याची मागणी काँग्रेसचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.

विशेष प्रतिनिधीमुंबई : दिल्लीच्या धर्तीवर मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करण्याची मागणी काँग्रेसचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.कोट्यवधीची लोकसंख्या असलेल्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात मुंबई महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. मुंबईकर आजही पायाभूत सुविधेपासून वंचित असल्याने दिल्लीच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेचे त्रिभाजन करून मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरात नवीन महापालिका स्थापन करा, अशी काँगे्रसचे आमदार नसीम खान यांनी केली.मुंबईत सुमारे दोन कोटीहून अधिक लोक राहतात. त्यांना नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. पण या पालिकेच्या काहीएक मर्यादा आहेत. पावसाळ्यात येथे नेहमीची खड्डे पडतात. आजही हीच परिस्थिती आहे. खड्डयात पडून अनेक जखमी तसेच मृत्यूमुखी पडतात. एवढेच नव्हे तर या मुंबानगरीची साफसफाईही व्यवस्थित होत नाही. एकऐवजी तीन महापालिका झाल्या तर प्रशासनात सुटसुटीतपणा येईल आणि नागरी सुविधा प्रभावीपणे पुरविता येतील, असे ते म्हणाले.मुंबईबरोबरच पूर्व व पश्चिम उपनगरात नवीन महापालिका स्थापन केल्यास या मुंबईला तीन महापौर, तीन आयुक्त मिळतील. त्यामुळे नागरी कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही नसीम खान यांनी केली.