शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

BMC ELECTION RESULT : मुंबईत पुन्हा ‘वूमन पॉवर’

By admin | Updated: February 24, 2017 00:03 IST

अटीतटीच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलाशक्ती पुन्हा उजळून निघाली आहे. आरक्षण असलेल्या ११४ जागांव्यतिरिक्त

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - अटीतटीच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलाशक्ती पुन्हा उजळून निघाली आहे. आरक्षण असलेल्या ११४ जागांव्यतिरिक्त १२ खुल्या प्रवर्गातून पुरुष उमेदवारांना मागे टाकत महिलांनी बाजी मारली आहे़ यामुळे २०१२च्या तुलनेत महिलांच्या आणखी पाच जागा वाढल्या आहेत. २२७ पैकी १२६ जागांवर महिला निवडून आल्या आहेत. यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता कोणाचीही असली तरी आवाज मात्र महिलांचाच घुमणार आहे़२०१२च्या महापालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. यामुळे ११४ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या, तरीही सर्वच राजकीय पक्षांनी खुल्या प्रवर्गातही महिलांना उमेदवारी दिली. यामुळे १०६ पुरुष नगरसेवक तर १२१ महिला नगरसेवक निवडून आल्या होत्या. यावेळेस आरक्षित प्रभागांतून १०८६ महिला उमेदवार असून ८० खुल्या प्रभागांतूनही महिलांना उमेदवारी मिळाली होती. सर्वच राजकीय पक्षांनी खुल्या प्रवर्गातही महिलांनाच प्राधान्य दिले. पक्षाने दाखविलेला हा विश्वास महिलांनीही सार्थक ठरवित विजय मिळवला आहे़ २०१२ मध्ये महिलांच्या सात जागा खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. यावेळीस ही ताकद आणखी वाढून १२ महिला नगरसेवक खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत़ यामध्ये काही दिग्गज महिला नगरसेवकांचाही समावेश आहे. मात्र महिलांची ताकद वाढली आहे. त्याप्रमाणे प्रशासनाला धारेवर धरण्यात व नागरी समस्या सोडविण्यातही त्या आघाडीवर असतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.अनुभवी, आक्रमक महिलांची टीम २०१२ मध्ये आरक्षणाचा थोडा फटका नगरसेविकांनाही बसला. काही दिग्गज नगरसेविकांना अन्य प्रभागातून निवडणूक लढावावी लागल्यामुळे त्यांचा पराभव झाला. मात्र या अनुभवी व आक्रमक महिला पुन्हा एकदा मैदानात उतरल्या़ शिवसेनेतून अशा माजी नगरसेविकांना पुन्हा संधी दिली. राजुल पटेल, शुभदा गुडेकर आणि माजी महापौर विशाखा राऊत अशा या दिग्गज महिला पुन्हा निवडून आल्या आहेत.खुल्या प्रवर्गातील महिलांची उमेदवारी११३ पैकी ८० खुल्या प्रभागात महिलांना उमेदवारी देण्यात आली़ यापैकी ३४ महिला घराणेशाही अथवा राजकारणात सक्रिय असलेल्या होत्या़ महिलांसाठी नव्हे मात्र मागासवर्गीयांसाठी आरक्षण असलेल्या ३० पैकी १८, अनुसुचित जाती व जमातीसाठी राखीव असलेल्या आठपैकी सहा तर कोणतेही आरक्षण नसलेल्या ७५ खुल्या प्रभागांतून २० महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या़अशी वाढली महिलाशक्ती२०१२ मध्ये २२७ पैकी १०६ पुरुष तर १२१ महिला नगरसेवक निवडून आले होते. यापैकी ९८ नगरसेविका पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. २०१७ च्या निवडणुकीत १२६ महिला निवडून आल्या आहेत.खुल्या प्रभागात विजयी महिलाशिवसेनेने राष्ट्रवादीतून आलेल्या नगरसेविका रिद्धी खुरसुंगे, भाजपातून ज्योती अळवणी, उपमहापौर अलका केरकर, राजश्री शिरवाडकर खुल्या प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत.नारीशक्तीची भक्कम विजयश्रीदेशातील सर्वाधिक हाय प्रोफाईल आणि उच्चभ्रू मलबार हिलमधील महानगरपालिका निवडणुकांत भाजपाच्या पाच महिला उमेदवारांपैकी चौघी विजयी झाल्या. पाचव्या जागेवरील भाजपा महिला उमेदवार फक्त दोन टक्के मतांनी हरल्या. भाजपाने जिंकलेल्या या चार प्रभागांमधील प्रभाग संख्या २१४ मधून सरिता पाटील आणि २१९मधून ज्योत्स्नाबेन मेहता सलग दुसºयांदा निवडून आल्या आहेत.

ताडदेव-महालक्ष्मी भागातील प्रभाग २१४ मधून सरिता पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर ५३०० मतांनी विजय मिळवला. खेतवाडी, गामदेवी भागातील प्रभाग २१७ मधून मीनल पटेल ७३४१ आणि शिवसेनेचा गड असलेल्या गिरगावच्या प्रभाग २१८ मध्ये डॉ. अनुराधा पोतदार ५३९५ मते मिळवून विजयी झाल्या. तर वाळकेश्वरच्या प्रभाग २१९ मध्ये ज्योत्स्ना मेहता ९९४२  मतांनी विजय मिळवून सलग दुसरा विजय मिळवला. भाजपाच्या या सर्व विजयी उमेदवारांसाठी आमदार मंगलप्रभात लोढा सक्रिय होते. प्रभाग २१४ ची जागा पुरुष वर्गासाठी खुली असूनही तेथे भाजपाच्या महिला उमेदवाराने विजय मिळवला.