शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

BMC ELECTION RESULT : मातोश्री बाहेर शिवसैनिकांचा जल्लोष

By admin | Updated: February 24, 2017 00:08 IST

आवाज कुणाचा...कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा यासह विविध घोषणांनी ‘मातोश्री’बाहेरील परिसर सेना कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - आवाज कुणाचा...कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा यासह विविध घोषणांनी ‘मातोश्री’बाहेरील परिसर  सेना कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. मतमोजणी सुरु होताच आणि काही निकाल हाती येताच शिवसैनिकांसह पदाधिकाºयांनी मातोश्रीबाहेर एकच गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्रीपर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकच वर्दळ होती. गेल्या पालिका निवडणुकीवेळी शिवसेनेला ७५ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा युती नसल्याने पूर्ण ताकदीनीशी उतरत शिवसेनेकडून प्रचारावर चांगलाच भर देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत १९ प्रचारसभा घेतल्या आणि प्रचारात मुसंडीही मारली. शिवसेना विरुध्द भाजप असेच चित्र मुंबईत होते आणि सेनेसाठी ही तर प्रतिष्ठेची लढाई होती. त्यामुळे बहुमताचा आकडा नक्की गाठू असा विश्वास सेनेला होता. गुरुवारी  सकाळी १0 वाजता मुंबईत ठिकठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आणि मतमोजणी केंद्रांबाहेर सेना कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. दोन तासांत काही विजयाचे निकाल येताच वांद्रे पूर्व येथील ‘मातोश्री’बाहेर एकच गर्दी जमण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत बहुतेक निकाल आल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. भगवे झेंडे, ढोलताशे, नगारे घेऊन वाजत-गाजत कार्यकर्ते मातोश्री बाहेर जमू लागले आणि ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्ते ताल धरत होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचीही संख्या मोठी होती. आवाज कुणाचा यासह अनेक घोषणा सेना कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. काही जणांकडून तर मिठाइचेही वाटप केले जात होते. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतीषबाजीही करण्यात आली. विजयी उमेदवारांचा तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांचा राबता हा रात्री उशिरापर्यंत सुरुच होता. दरम्यान, दादरसह वरळी, लालबाग, परळ आणि भायखळा हे पारंपरिक गडांमध्ये शिवसेना उमेदवारांनी एकहाती विज मिळवल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनकडेही धाव घेतली. ढोल-ताशांच्या गजरातच गुलालाची उधळण करत शिवसेना भवनचा परिसर भगवा झाला होता. दुपारी उशिरापर्यंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वाट पाहत होते. यावेळी शिवसेना आमदार निलम गो-हे आणि सुनिल शिंदे यांनीही शिवसैनिकांसह जल्लोषात भाग घेतला.