शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

BMC ELECTION RESULT : ईश्वर चिठ्ठी भाजपाच्या नावे

By admin | Updated: February 23, 2017 19:40 IST

ईश्वरचिठ्ठीच्या प्रक्रियेत भाजपाला लॉटरी लागली असून भाजपाचे उमेदवार व माजी आमदार अतुल शहा यांचा विजय झाला आहे.

ऑनलाइन लोकमत/ स्नेहा मोरे
मुंबई, दि. 23 -  प्रभाग क्रमांक 220 मध्ये फेरमोजणीतही ‘सेम-सेम’ मतदान झालेल्या शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांचे भवितव्य ईश्वरचिठ्ठीद्वारे ठरवण्यात आले. या ईश्वरचिठ्ठीच्या प्रक्रियेत भाजपाला लॉटरी लागली असून भाजपाचे उमेदवार व माजी आमदार अतुल शहा यांचा विजय झाला आहे. 
 
सेना-भाजपात अटी-तटीची लढत झाल्यानंतर तणावपूर्ण वातावरण झालेल्या या प्रभागात अखेर शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांचा पराभव झाला असून भाजपाने बाजी मारली आहे.220 प्रभागात शिवसेना आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होती.
 
शिवसेना उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपा उमेदवार आणि माजी आमदार अतुल शहा यांच्या प्रभागातील मतमोजणीच्या वेळी 13 फे-यानंतर दोघांचीही मते 5 हजार 946 आली. फेरमतमोजणीतही टाय झाल्याने ईश्वरचिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
फेरमतमोजणीनंतर झालेल्या बैठकीत निवडणुक अधिका-यांनी कायद्यातील तरतुदींचा आढावा घेऊन ईश्वरचिठ्ठीचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थित ही प्रक्रिया झाली, आणि मग भाजपा उमेदवार अतुल शहा यांना विजयी घोषित करण्यात आले.