शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कडाक्याच्या उन्हात पसरली बेशरमची हिरवाई

By admin | Updated: March 31, 2017 17:44 IST

ब्रम्हानंद जाधव बुलडाणा, दि. 31: बुलडाणा शहराची जीवनरेषा असलेल्या ऐतिहासिक येळगाव धरणाचे सौंदर्य बेशरममध्ये बुडाल्याचे दिसून येत आहे. संपुर्ण ...

ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा, दि. 31: बुलडाणा शहराची जीवनरेषा असलेल्या ऐतिहासिक येळगाव धरणाचे सौंदर्य बेशरममध्ये बुडाल्याचे दिसून येत आहे. संपुर्ण शहराची तहान भागविणाऱ्या या येळगाव धरणात कडाक्याच्या उन्हात बेशरमची हिरवाई पसरल्याने धरणाचे अस्तिव धोक्यात सापडले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर धरणांमध्येही बेशरम सारख्या वनस्पती व झुडूपांचे प्रमाण वाढल्यानेधरणाच्या भिंतीला धोका पोहचू शकते. बुलडाणा शहराची ऐतिहासीक तलाव व धरणाने एक ओळख निर्माण केलेली आहे. सध्याबुलडाणा शहराला येळगाव पाणी पुरवठा होतो. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी येळगाव धरणावर पाणी शुद्धीकरणासाठी मोठा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. ऐतिहासीक येळगाव धरण हे बुलडाणा शहराची जीवनरेषा समजली जात असून, यासाठी वारंवार शासनस्तरावरू निधीही दिल्या जातो. गतवर्षी या धरणातील गाळ काढण्यात आल्याने यावर्षी येळगाव धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, येळगाव धरणावर बेशरम ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर उगवली आहे. कडाक्याच्या उन्हात येळगाव धरणावरील बेशरम वनस्पती हिरवाईचा शालू पांघरलेली दिसते. बेशरमबरोबरच इतर काटेरी झुटूपे व झाडेही धरणाच्या काठावर वाढल्याने धरणाचे अस्वित्व धोक्यात सापडले आहे.  तसेच जिल्ह्यातील इतर धरण, तलाव व नद्यांमध्ये अशाच प्रकारचे झाडे व झुडूपांचे प्रमाणवाढले आहे. त्यामुळे काही धरणांच्या भिंतीला तर तडे गेलेले आहेत. त्यामुळे संपुर्ण शहराची तहान भागविणाऱ्या या धरणावरिल बेशरमची विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

https://www.dailymotion.com/video/x844vha