शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्यांच्या प्रयत्नांचे गालबोट

By admin | Updated: August 16, 2015 02:49 IST

शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्याचा निषेध नोंदवत चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विषप्राश्न करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर मुंबई उच्च न्यायालयाचे

कोल्हापूर, चंद्रपूर : शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्याचा निषेध नोंदवत चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावे, या प्रलंबित मागणीसाठी सहा वकिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील दमपूर मौदा येथील महाविद्यालयात ही घटना घडली. शिष्यवृत्ती देण्यास महाविद्यालय प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या तक्रारीची दखल न घेतली गेल्यामुळे कृष्णा राठोड (१८), प्रेमदास रामदास राठोड (१८), प्रफुल्ल राठोड (१७), प्रवीण जाधव (१८) या विद्यार्थ्यांनी विषप्राशन केले. खंडपीठासाठी अंगावर ओतले रॉकेल...स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील शासकीय इमारतीजवळ वकील संघटनांचे काही सदस्य जमले होते. त्यांनी येथे खंडपीठ करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली. त्यापेकी सहा वकिलांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच रोखून ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर येथे खंडपीठ करण्याची मागणी वकिलांच्या संघटनांनी लावून धरली आहे.चारही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत आहे...महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी चारही विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.