चाकण : मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आमराळवाडी (ता. खेड) येथे २२ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.टायगर गुलाब काळे असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना २ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आमराळवाडी (दावडी) येथे वीटभट्टीजवळ घडली. शनिवारी (दि. ५) एका तरुणाचा मृतदेह चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौंडकरवाडीजवळील कॅनॉलमध्ये आढळला होता. मृत टायगर गुलाब काळे याचे आरोपीच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आरोपी व त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांनी टायगरला दारू पाजली व लाकडी दांडक्याने मारहाण करून कपड्याने गळा आवळून खून केला. कपड्यात विटांचे खंगर बांधून टायगरला दावडीच्या कॅनॉलमध्ये पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने फेकून दिले. हा मृतदेह चाकण हद्दीत वाहून आल्याने चाकण पोलीस ठाण्यात नोंद करून गुन्हा राजगुरुनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. याबाबतची फिर्याद तंगुशी गुलाब काळे यांनी फिर्याद दिली आहे.
प्रेमसंबंधातून तरुणाचा खून
By admin | Updated: March 7, 2016 01:54 IST