शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तीक्ष्ण हत्याराने तरुणाचा खून

By admin | Updated: October 21, 2016 17:39 IST

घरातून बाहेर पडलेला एक २६ वर्षीय युवक गुरुवारी रात्री परतला नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र तो आढळला नाही.

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. २१ : घरातून बाहेर पडलेला एक २६ वर्षीय युवक गुरुवारी रात्री परतला नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र तो आढळला नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी त्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे आढळले. ही घटना शहरातील टागोर नगर परिसरात घडली आहे.

सूरज गणपत अंकुशे (वय २६, रा. कॉईल नगर, लातूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सूरज अंकुशे हा गुरुवारी सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडला होता. नेहमीप्रमाणे तो सायंकाळी घरी परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. पण तो कुठेच आढळून आला नाही. तो शहरातील मार्केट यार्ड परिसरात मिळेल ती कामे करीत असे. त्यामुळे नातलगांनी या परिसरात शोधाशोध केली. परंतु, त्याचा पत्ताच लागला नाही.

सूरज हा कोठे तरी गेला असेल. सकाळी परत येईल, अशा अपेक्षेने नातेवाईक होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सूरजचा मृतदेह शहरातील टागोर नगर परिसरातील सूर्यमुखी हनुमान प्रतिष्ठानच्या उद्यानात आढळून आला. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने दहा ते अकरा वार करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली असता धारदार शस्त्राने खून करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

नातलगांकडून आक्रोश... नेहमीप्रमाणे सूरज हा गुरुवारी सकाळी घराबाहेर पडला होता. तो परतला नसल्याने आम्ही शोधाशोध केली. मात्र तो सापडला नाही. सूरज हा भोळसर स्वभावाचा होता. त्यामुळे त्याचे कोणाशीही वैर असू शकत नाही, असे सूरजची मावशी वच्छला गायकवाड यांनी सांगून आक्रोश करण्यास सुरुवात केली. सूरज याच्या पश्चात आई, दोन बहिणी, तीन भाऊ असा परिवार आहे.