शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शहरी तरुणांची व्यसनेच वाढवताहेत रक्तदाब

By admin | Updated: May 18, 2016 04:03 IST

जागतिक स्पर्धेमुळे तरुणांना कार्पोरेट सेक्टरमध्ये टिकून राहण्यासाठी निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते.

भार्इंदर : जागतिक स्पर्धेमुळे तरुणांना कार्पोरेट सेक्टरमध्ये टिकून राहण्यासाठी निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते. यामुळे त्यांच्या आहार घेण्याच्या जीवनशैलीत बदल होत असून कामाचा वाढता व्याप तसेच पिझ्झा, बर्गर, फ्रॅन्की आदी जंक फुडचे सेवन, धुम्रपानच्या सवयी यांमुळे तरुणांत उच्च रक्त दाबाचे प्रमाण वाढत असल्याची माहिती हृदयरोगतज्ञ डॉ. चेतन भांबुरे यांनी दिली. १७ मे रोजी ‘जागतिक उच्च रक्त दाब दिन’ असतो, त्यानिमित्ताने डॉ. भांबुरे यांनी ही माहिती दिली. कामाच्या ताणतणावात आपल्याला उच्च रक्तदाब असल्याची जाणीव तरुणांना होत नसल्याने त्यांचे उपचारांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे चोरपावलांनी शरीरात प्रवेश करणारा उच्च रक्तदाब आरोग्याला धोकादायक ठरतो. रक्तदाबाचा त्रास जितका जास्त तितकाच हृदयविकाराचा झटका येण्याची अथवा हृदय बंद पडण्याची शक्यता अधिक बळावते. काही तरुणांमध्ये ही लक्षणे आजार तीव्र होईपर्यंत दिसत नाहीत.ज्यावेळी आजार गंभीर स्वरुप धारण करुन लक्षणे अधिक तीव्र करतो. त्यावेळी मात्र आजाराची लागण झाल्याची जाणीव होते. तोपर्यंत शरीरातील मुत्रपिंड, डोळे व हृदय या संवेदनशील इंद्रियांवर दुष्परिणाम झालेले असतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या अतिरीक्त कार्यामुळेच त्याच्या ठोक्यांवर परिणाम होऊन ते बंद पडण्याची शक्यता असते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तणावाचे प्रमाणही वाढते असून ते सहन करण्याची मानसिक शक्ती मात्र नसते. विशी पंचविशीचे तरुणही याला बळी पडताना दिसतात. त्यामुळे त्यांना याचा बराच त्रास होतो. परिणामी त्यांच्या शरीरात उच्च रक्तदाब आजार प्रवेश करुन त्यांचे आयुष्य कमी करण्यास सुरुवात करतो. येत्या ४ वर्षांत देशातील एकुण लोकसंख्येपैकी ३० कोटी लोकांना हा आजार जडण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे योग्य व वेळेत आहाराचे सेवन, धुम्रपान न करता पुरेसा व्यायाम शरीराला आवश्यक असुन तणावरहित जीवनच उच्च रक्तदाबाला थोपवता येऊ शकते, असेही डॉ. भांबुरे म्हणाले. (प्रतिनिधी)