शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नवजात ‘नकोशी’चा पित्याकडून खून

By admin | Updated: August 17, 2015 00:49 IST

नवजात मुलीची पित्यानेच हत्या करण्याची माणुसकीला काळीमा फासणारी संतापनजक घटना स्वातंत्र्यदिनी तालुक्यातील दाताडा खुर्द येथे घडली

सेनगाव (जि. हिंगोली) : नवजात मुलीची पित्यानेच हत्या करण्याची माणुसकीला काळीमा फासणारी संतापनजक घटना स्वातंत्र्यदिनी तालुक्यातील दाताडा खुर्द येथे घडली. पोलिसांनी डिगांबर तुकाराम कदम (५३) या नराधम पित्याला अटक केली आहे.सेनगाव तालुक्यातील दाताडा (खु.) येथे प्रयागबाई डिगांबर कदम (४६) यांची १५ आॅगस्टला पहाटे चारच्या सुमारास राहत्या घरी प्रसुती झाली. त्यांचा मोठा मुलगा २० वर्षांचा आहे. आपण व आपली पत्नी पन्नाशीच्या घरात असल्याने जन्मलेल्या मुलीचा भविष्यात कसा सांभाळ करणार, या भीतीपोटी डिगांबरने नवजात मुलीची गळ्यावर वार करून हत्या केली तसेच खुनाचा प्रकार दडपण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोटच्या मुलीचा पतीनेच खून केल्याचे प्रयागबाईच्या लक्षात येताच तिने हंबरडा फोडला. त्यातून खुनाला वाचा फुटली. प्रयागबाई यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना हिंगोलीच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पित्याच्या या अमानवी कृत्यामुळे घाबरलेल्या सतीश डिगांबर कदम याने सेनगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक करून घरात लपवून ठेवलेल्या नवजात मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. (प्रतिनिधी)