शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

गोव्यात लोकशाहीचा खून - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 15, 2017 08:48 IST

सामानातील लेखात शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजापाला टार्गेट केले आहे. यावेळी त्यांनी गोवा आणि केंद्रातील सरकारवर टीका केली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - मुंबई महानगरपालिका निवडणूका जाहिर झाल्यानंतर शिवसेने भाजपाशी युती तोडत एकला चलो रे चा नारा लगवला होता. मुंबईमध्ये जागावाटपावरुन दोन्ही मित्रपक्षामध्ये दुरावा निर्माण झाला होता. भाजपाला 40 जागाही निवडणून येणार नाहीत अशा तोऱ्यात शिवसेना होती. महापालिका निवडणूकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने न भूतो न भविष्यती यश मिळवत शिवसनेच्या अडचणी वाढवल्या. भाजपामुळे शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. याचं वेळी फडणवीस यांनी सरकार वाचवण्यासाठी बिनविरोध पाठिंबा देण्याचा निर्णय घेतं वाद शमवण्याचा प्रयत्न केला. पण भाजपाने शिवसेनेला डिवचल्यामुळे शांत राहिल ती कसली शिवसेना. सध्या सुरु असलेलं अधिवेशनासह, कारभारावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या शिवसेनेने वारंवार भाजपावर टीकास्त्र सोडले. भाजपाला धडा शिकविण्याच्या हव्यासातून शिवसेनेना गोव्यातील राजकीय मैदानात उतरला व त्याने लज्जास्पद कामगिरी बजावली. गोव्यामध्ये शिवसेनेचे तीन उमेदवार उभे होते. या तीघांना मिळून गोव्यात फक्त 750 मते मिळाली आहेत. वास्तविक शिवसेनेने ही निवडणूक का लढविली, हाच मुळी एक गहन प्रश्न आहे. शिवसनेचे गोव्यात अस्तित्वच नाही. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी चौथ्यांदा शपथ घेतली. गोव्यातील शिवसेनेच्या अवस्थेमुळे सोशल मीडियावर ते चर्चेचा विषय ठरले आहेत. आजच्या सामानातील लेखात शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजापाला टार्गेट केले आहे. यावेळी त्यांनी गोवा आणि केंद्रातील सरकारवर घनाघाती टीका केली. शिवसेनेची अवस्था मुंबई टू गोवा या चित्रपटातील विनोदासारखीच झाली म्हटल्यास हरकत नाही.

(गोव्यात शिवसेनेला मिळाली अवघी 750 मत, डिपॉझिटही जप्त)

शिवसेना मुखपत्र सामनातून गोव्यातील सत्ता कराणावर तोफ डागली आहे. सत्तेसाठी गोव्यात जी राजकीय धुळवड खेळली गेली तिला लोकशाहीचा खून याशिवाय वेगळे काही म्हणता येणार नाही. अर्थात, लोकशाहीचा असा खून गोव्यात अनेकदा झाला आहे. त्यात आणखी एका खुनाची भर पडली. खून पचवायची शक्ती आमच्या लोकशाहीला मिळो. अशी टीका सामनामधून भाजपावर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या तुलनेत कमी जागा मिळवूनही गोव्यातील सत्तास्पर्धेत भाजपाने तूर्त तरी आघाडी घेतली आहे. अर्थात त्यासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रातील संरक्षणमंत्रीपद सोडून पुन्हा गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री होण्याची वेळ आली आहे. ज्या पाच राज्यात निवडणुका झाल्या त्यात गोवा हे सर्वात छोटे राज्य, पण तेथे झालेली राजकीय उलथापालथ मोठीच म्हणावी लागेल. सामनातील महत्वाचे मुद्दे - गोव्यातील निकाल पूर्णपणे भाजपाच्या विरोधात गेले आहेत. गोव्याचा भौगोलिक आकार उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्हय़ापेक्षाही लहान असावा. - सत्ताधारी भाजपला जनतेने नाकारले व काँग्रेसला 17 जागा देऊन मोठा पक्ष म्हणून निवडून आणले. हा पराभव नक्की कोणाचा? - मुख्यमंत्री पार्सेकरांसह अर्धा डझन विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला- मनोहर पर्रीकर हे संरक्षणमंत्री म्हणून मोदी सरकारला ओझे झाले असावेत किंवा स्वतः मनोहर पर्रीकरांना दिल्लीपेक्षा गोवाच बरे असे वाटल्याने ते स्वतःच परतले आहेत- संरक्षणमंत्री असताना पर्रीकर यांचा मुक्काम सदासर्वकाळ गोव्यातच होता व गोव्यातून ते पाकिस्तानसारख्या देशाच्या दुश्मनास सुका दम भरीत होते. - सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी ज्या वेगवान हालचाली कराव्या लागतात त्यात काँग्रेस मागे पडली- काँग्रेस सुस्त राहिली म्हणून भाजपविरोधात निवडून आलेले पक्ष भाजपच्याच घोडेबाजारात सामील झाले आणि बुधवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा शपथविधीही पार पडला. - गोव्याच्या बाबतीत भाजपने काँग्रेस परंपरेचीच ह्यरीह्ण ओढली.