शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दलित तरुणाचा खून; बारा जणांवर गुन्हा

By admin | Updated: July 4, 2015 02:54 IST

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अटकेतील आरोपी सनी शरद शिंदे याचे सुधारगृहातून अपहरण करून खून केल्याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अटकेतील आरोपी सनी शरद शिंदे याचे सुधारगृहातून अपहरण करून खून केल्याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.नगर महापालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश भोसले यांचाही गुरुवारी रात्री उशिरा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. शुक्रवारी दिवसभर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणाव होता. सायंकाळी पोलीस बंदोबस्तात सनीचा मृतदेह बुरुडगाव येथील त्याच्या घरी आणण्यात आला़ मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत त्याचे नातेवाईक हजर नसल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. सनीच्या खून प्रकरणी त्याची आत्या नंदा घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे़ गुरुवारी सनीच्या नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेसाठी मोर्चा काढला होता. (प्रतिनिधी)तरुणाच्या घराला कुलूप सनीच्या बुरुडगाव येथील घराला कुलूप होते़ बराच वेळ होऊनही त्याचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पुढे आले नाहीत़ मुलीच्या अपहरण प्रकरणात त्याचे वडील शरद शिंदे व भाऊ अटकेत आहेत. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे़ थोरला भाऊ श्रीरामपूर येथे असतो़ तो सुद्धा रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेला नव्हता. त्याची आई बीडहून नगरकडे येण्यास निघाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनाचा उलगडा : बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातील वांजरा फाट्यावर बुधवारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला. त्यानंतर नगरच्या सुधारगृहातून अपहरण झालेल्या मुलाचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले़ अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी अटक केलेल्या सनीला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान त्याचा खुन करण्यात आला.