शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

रक्तदान शिबिरामधून १४८ युनिट रक्त गोळा

By admin | Updated: August 10, 2016 23:43 IST

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग अंतर्गत झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण १४८ युनिट रक्त गोळा करण्यात विद्यार्थ्यांना यश आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेचे श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाच्या (बी. वर्तक) राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग अंतर्गत झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण १४८ युनिट रक्त गोळा करण्यात विद्यार्थ्यांना यश आहे. श्री सत्य साई सेवा संघटना, मुंबई आणि भगवती रुग्णालय रक्तपेढी, बोरीवली यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरामध्ये यावेळी थॅलेसेमिया चाचणी आणि रक्तगट तपासणीही करण्यात आली.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. व्ही संत, उपप्राचार्य डॉ. एन. बी. आचार्य आणि उपप्राचार्य डॉ. आर. पी. देशपांडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या शिबिरामध्ये सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना शतकी मजल मारण्यात यश आले. त्याचप्रमाणे तब्बल २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी व परिसरातील नागरिकांनी थॅलेसेमिया चाचणी करुन घेतली. यावेळी प्राचार्या संत यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व आणि एनएसएस कार्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक रक्तदात्या विद्यार्थ्याची चौकशीही केली. विशेष म्हणजे गेल्यावर्षी १० वर्षाहून अधिक काळानंतर शतकी मजल मारलेल्या बी. वर्तक महाविद्यालयाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी शतकी मजल मारत १४८ युनिट रक्त गोळा करण्यात यश मिळवले. दरम्यान, विद्यार्थ्यांसह शिक्षक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला. एनएसएस प्रोग्राम आॅफिसर प्रा. प्रविण गाडगे, प्रा. रामू कोकणी आणि प्रा. मृणाल खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वी केले. (प्रतिनिधी)..............................................तरुणांनी एचआयव्ही-एड्स बाबत अधिक माहिती घेऊन, त्यापासून दूर रहावे. एचआयव्ही लागण झाल्यानंतर १०-१५ वर्षांनी एड्सचे लक्षण दिसून येतात. आम्ही जेव्हा कधी महाविद्यालयीन स्तरावर रक्तदान शिबिर घेतो तेव्हा तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळतो. आज रक्तदानाबाबत समाजामध्ये वाढलेली जनजागृती अत्यंत आनंदाची बाब असून यामध्ये तरुणांचा असलेला मोठा सहभाग कौतुकास्पद आहे.- गजानन वाघ, समाजविकास अधिकारी - राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी).........................................गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रक्तदान शिबिरामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिबिर नियोजन करणे आव्हानात्मक ठरले. संपुर्ण एनएसएस टीमसह एकत्रितपणे काम केल्याचा चांगला अनुभव मिळाला. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले असल्याने आमच्या प्रयत्नांना मोठे यश आले.- स्वप्नाली म्हात्रे आणि शुभम जुनघरे (विद्यार्थी प्रमुख, एनएसएस)