शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ब्लड आॅन कॉल केवळ नावालाच !

By admin | Updated: August 1, 2016 17:42 IST

गरजू रुग्णांना वेळेवर आणि शासकीय शुल्कामध्ये रक्त उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जीवन अमृत सेवा (ब्लड आॅन कॉल) योजना ७ जानेवारी २0१४ पासून सुरू केली.

- नितीन गव्हाळे,
अकोला, दि.१ - गरजू रुग्णांना वेळेवर आणि शासकीय शुल्कामध्ये रक्त उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जीवन अमृत सेवा (ब्लड आॅन कॉल) योजना ७ जानेवारी २0१४ पासून सुरू केली. १0४ क्रमांकावर संपर्क साधून गरजु रूग्णांना एका तासाच्या आता रक्त मिळाले पाहिजे. असा या योजनेचा हेतू आहे. परंतु रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ही सेवा जीवन अमृत सेवा नसून जीवन मृत सेवा असल्याचा अनुभव येत आहे.  एका रूग्णाच्या नातेवाईकाने १0४ क्रमांकावर कॉल करूनही त्यांना तीन दिवस रक्त मिळाले नाही. ब्लॅड आॅन कॉल योजना केवळ नावालाच असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. 
अकोला तालुक्यातील खेकडी गावातील निकीता सुरेश मोरे या युवतीला आजारपणामुळे शहरातील खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी ती अशक्त असल्यामुळे तिला रक्त देण्यास सांगितले. नातेवाईकांनी रक्तासाठी ब्लड आॅन कॉलच्या १0४ क्रमांकावर संपर्क साधला आणि एबी पॉझिटिव्ह रक्तगटाची मागणी केली. नातेवाईकांना रक्त लवकरच पाठविण्यात येईल. असे सांगण्यात आले. परंतु दोन दिवस उलटूनही रूग्णाला रक्त मिळाले नाही. अखेर नातेवाईकांनी खासगी रक्तपेढी रक्तपिशवी निकीताला रक्त चढविले. त्यामुळे शासनाने सुरू केलेली ही योजना गरजु रूग्णांना रक्त पुरवठा करण्यात अपयशी ठरली आहे. रूग्णांना वेळेवर रक्त मिळत नसेल तर या योजनेवर शासन कशासाठी लाखो रूपयांचा खर्च करीत आहे. रक्ताची बाटली रुग्णाचा जीव गेल्यावर मिळणार का? असा सवाल रूग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे. 
राज्य रक्त संक्रमण परिषदेने जीवन अमृत सेवा सुरू केली. त्यामध्ये १0४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आवश्यक त्या गटाचे ठिकाणी रक्त उपलब्ध करून दिले जाते. दूरध्वनी केलेल्या परिसराच्या ४0 किलो मीटर परिघात रक्त उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे.  मात्र, अलीकडे १0४ या क्रमांकावर अनेकदा संपर्क करून हा क्रमांक लागत नाही. कधी कधी हा संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगितले जाते. काहींना आलेल्या अनुभवानुसार दूरध्वनी उचलल्यानंतर रक्त मागणीची माहिती घेतली जाते. पुढे काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देणारी ही योजना नावालाच असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. मात्र, केवळ चांगल्या प्रकारे न चालविल्याने त्यांचा लाभ रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना घेता येत नसल्याचे चित्र आहे.