शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून व्यावसायिकाचा खून

By admin | Updated: January 22, 2016 03:42 IST

रविवारपासून बेपत्ता असलेल्या एका व्यावसायिक पैशांच्या व्यवहारातून खून झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. औरंगाबाद- नगर रोडवरील एका हॉटेलमध्ये डोक्यात गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला.

औरंगाबाद : रविवारपासून बेपत्ता असलेल्या एका व्यावसायिक पैशांच्या व्यवहारातून खून झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. औरंगाबाद- नगर रोडवरील एका हॉटेलमध्ये डोक्यात गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. नंतर तीक्ष्ण हत्याराने शीर वेगळे करून पोत्यात भरलेले धड खाम नदीत फेकण्यात आले. तर शीर पैठण रोडवरील नक्षत्रवाडी शिवारातील नाल्यात फेकण्यात आले होते.अनिल हवासिंग शर्मा (४५) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून या प्रकरणी मुख्य आरोपी हॉटेल व्यावसायिक संतोष माधवराव पाटील, त्याचा साथीदार संतोष ऊर्फ बापू कांतीलाल जगताप व हॉटेल वेटर राजू अशोक राऊत या तिघांना अटक करण्यात आली आहे.शर्मा यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे, तर पाटील याचा पूर्वी गारखेडा परिसरात लेडीज बार होता. बारमध्येच पाटील आणि शर्मा यांची ओळख झाली. काही महिन्यांपूर्वी संतोषने शर्मा यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. नंतर ठरलेल्या मुदतीन त्याने ही रक्कम परत केली नाही. शर्मा यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. पाटीलने हा बार बंद करून नगर रोडवरील गंगापूर फाट्याजवळ एक हॉटेल चालविण्यासाठी घेतले. गेल्या काही दिवसांपासून संतोषने ‘लवकरच पैसे परत करतो,’ असे आश्वासन देत शर्मा यांच्याशी पुन्हा जवळीक साधली होती. वाढदिवसानिमित्त आपण पार्टी देत आहोत, असे सांगून पाटीलने शर्मा यांना रविवारी हॉटेलवर येण्याचे आमंत्रण दिले. तसेच पुण्यातील मित्र बापू जगतापलाही त्याने बोलावून घेतले. पहाटेपर्यंत पार्टी केली. नशेत पैशांचा विषय निघाला आणि भांडण सुरू झाले. तेव्हा संतोषने रिव्हॉल्व्हर काढली आणि तीन गोळ्या अनिल शर्मा यांच्या डोक्यात मारल्या. त्यानंतर वेटर राजू राऊतच्या मदतीने दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली.