शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे लोटाबंदीला अडथळा

By admin | Updated: December 25, 2016 17:42 IST

मार्च २०१७ पर्यंत ग्रामीण भागातील ३५४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत/हर्षनंदन वाघबुलडाणा, दि. 25 - जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानांतर्गंत मार्च २०१७ पर्यंत ग्रामीण भागातील ३५४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र नोटाबंदीमुळे शौचालय बांधकाम करणारी यंत्रणा अडचणीत आली असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची कसरत होत आहे. जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतीपैकी १५२ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतीपैकी ३५४ ग्रामपंचयती हागणदारीमुक्त करण्यासाठी मार्च २०१७ पर्यंत उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. तर शासनाने ३१ डिसेंबर नंतर उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचेआदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी व कर्मचारी उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी कसरत होत आहे. लाभार्थ्यास घरी शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी १२ हजार रूपये अनुदान देण्यात येत आहे. मात्र नोटाबंदीमुळे शौचालय लाभार्थ्यांस बँक खात्यातून पैसे काढणे कठीण झाले आहे. शौचालय मंजूर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायततर्फे शौचालय लाभार्थ्यांस १२ हजाराचा धनादेश देण्यात येत आहे. मात्र सदर धनादेश बँकेत जमा करण्याठी लाभार्थ्यांला शेतीचे कामे प्रलंबित ठेवून बँकेत धनादेश जमा करीत आहेत. मात्र अनेक बँकेकडून नोटाबंदीमुळे कामेवाढल्याने धनादेश वटविण्याचे काम चार पाच दिवस विलंब होत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत. तर  चार-पाच दिवसानंतर बँक खात्यात धनादेश जमा झाल्यानंतही लाभार्थ्याच्या हातात पूर्ण पैसे येत नसल्यामुळे शौचालय बांधकाम बंद ठेवण्यात येत असल्याचे चित्र ग्रामीण भागत दिसत आहे.शौचालय बांधकामाला पैशाची सुट द्यावीजिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गंत मार्च २०१७ पर्यंत असलेले उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुकाअ दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहेत. मात्र नोटाबंदीमुळे अनेक गावात वेगात असलेली शौचालयाची कामे खोळंबली आहेत. अनेक मजुरांना मजुरी देण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे शौचालय बांधकामलाभार्थींना अनुदानाची रक्कम रोख स्वरूपात बँकेकडून मिळावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.