शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मधुर भांडारकर यांची काँग्रेसकडून नाकाबंदी

By admin | Updated: July 16, 2017 00:38 IST

‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पुण्यात आयोजित दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद व कार्यक्रम शनिवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले़

- लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पुण्यात आयोजित दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद व कार्यक्रम शनिवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले़ काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेल क्राउन प्लाझामध्ये घुसून तीव्र आंदोलन केले. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या परवानगीशिवाय हा चित्रपट पुणे शहरात प्रदर्शित केल्यास, पक्षाचेकार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व चित्रपटांचे प्रदर्शन रोखून धरतील, असा इशारा शहर काँग्रेसने दिला आहे़ गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागल्याची माहिती भांडारकर यांनी दिली.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे २०१७ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ते संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्याला विरोध करण्यासाठीच भाजपाच्या छुप्या पाठिंब्याने मधुर भांडारकर ‘इंदू सरकार’ प्रदर्शित करण्याचा तयारीत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आक्रमक भावनांमुळे भांडारकर यांचे पुण्यातील बावधन परिसरातील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, कोंढवा व पुणे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये होणारे कार्यक्रम रद्द करावे लागले.भांडारकर यांची पत्रकार परिषद एनआयबीएम रस्त्यावरील बीटोज बार अँड किचन या हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजता ठरली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करू शकतात, हे लक्षात आल्यानंतर ती रद्द करण्यात आली. त्यानंतर, भांडारकर बावधनमधील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमधील पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र, त्या ठिकाणीही कार्यकर्ते विरोध करण्यासाठी सज्ज असल्याने भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला.ते पुणे स्टेशनजवळील क्राउन प्लाझा या हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी तिकडे मोर्चा वळविला. मात्र, भांडारकर यांनी आपली मानसिक स्थिती बरी नसल्याचे कारण सांगून काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त होत काँगे्रसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अविनाथ बागवे, डॉ. म. वि. अकोलकर, नगरसेवक युसूफ शेख, यांच्यासह कार्यकर्त्यांनी भांडारकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंढे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.