शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी चारही मार्गांवर ब्लॉक

By admin | Updated: April 22, 2017 02:54 IST

यंदाच्या रविवारी गरज असेल, तरच प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम

मुंबई : यंदाच्या रविवारी गरज असेल, तरच प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर तर बारा तासांचा ब्लॉक होणार असून शनिवारी मध्यरात्री ते रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ब्लॉकचे काम चालेल. रुळांची आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती यासह काही तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ११.३0 ते सायंकाळी ४.३0 पर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकात डाऊन लोकल थांबणार नाहीत. हार्बर मार्गावरही सीएसटी ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनच्या वेळेप्रमाणेच हा ब्लॉक चालेल. ब्लॉक दरम्यान सीएसटी ते कुर्ला आणि सीएसटी ते वांद्रे दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल, तर पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. ठाणे ते वाशी, नेरूळ या ट्रान्स हार्बर मार्गावरही रविवारी दुपारी १२.३५ ते दुपारी २.0५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते नेरूळ, वाशी, पनवेल दरम्यानच्या लोकल या वेळेत रद्द करण्यात आल्या आहेत. हार्बरवर विस्तारीकरणाच्या कामासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून जोगेश्वरी स्थानकात काही कामे हाती घेतली जातील. या कामासाठीही पश्चिम रेल्वेवर बारा तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम २२ एप्रिल रोजी म्हणजेच शनिवारी मध्यरात्री बारा ते दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत चालेल. या कामामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर राम मंदिर स्थानकात लोकल गाड्यांना थांबा देण्यात येणार नाही. तांत्रिक कामासाठी ब्लॉक- रुळांची, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती, काही तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर स.११.३0 ते सायंकाळी ४.३0 पर्यंत ब्लॉक - हार्बर मार्गावरही सीएसटी ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक