शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अंध गुरुजींचा स्वावलंबनाचा मंत्र !

By admin | Updated: July 31, 2016 04:10 IST

अंध असलेल्या घारापुरकर गुरुजींच्या ‘डोळस’ व्यवसायाने स्वाभिमानाचे जगणे त्यांच्या ओंजळीत टाकले

राजकुमार जोंधळे,

लातूर- अंध असलेल्या घारापुरकर गुरुजींच्या ‘डोळस’ व्यवसायाने स्वाभिमानाचे जगणे त्यांच्या ओंजळीत टाकले आहे. जन्मत:च अंध असलेल्या गुरुजींनी आपल्या अंध बांधवांना शिक्षणाचे धडे देत त्यांच्यातही स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा पेरली आहे. नांदेड जिल्ह्यातील घारापूर (ता. हिमायतनगर) येथील सुधाकर सदाशिवराव घारापूरकर गुरुजींनी नोकरीनिमित्त १९७१मध्ये आपले गाव सोडले आणि कोकणातील मालवणमध्ये शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर १९७४ साली लातुरात बदली झाल्यानंतर त्यांचा लेबर कॉलनीत मुक्काम झाला. तेव्हापासून ते लातुरात वास्तव्यास आहेत. अंधांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी २ आॅक्टोबर १९८७ साली अंधजन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. आज या मंडळामार्फत ३० पेक्षा अधिक मुलांना रोजगार आणि निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील श्रीकृष्ण नगरात प्रिटींग, द्रोण-पत्रावळी, छोट्या प्लेट, वायरच्या खुर्चा, फाईल्स तयार करणे, स्क्रिन प्रिटींग, बुकबायडिंग आदीं व्यवसाय येथे सुरु आहेत. मंडळाच्यावतीने यासाठी कच्चा माल पुरवठा केला जातो. तयार मालाला लातूर, परभणीची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.>डोळसांना लाजवेल अशी कामगिरी...गेल्या आठ वर्षापासून सुधाकर घारापूरकर गुरुजींनी पेपरपासून द्रोण, पत्रावळी, केळीचे पान, थर्माकोलपासून नाश्त्याच्या डिश बनविण्याचा उद्योग थाटला आहे. आजही ते दररोज या मशिनवर हे साहित्य तयार करण्याचे काम नेटाने करतात.