शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोटेतल्या सुप्रिया केमिकल्समध्ये स्फोट; पाच जण भाजले, दोघे गंभीर

By admin | Updated: October 26, 2016 00:15 IST

सुप्रिया केमिकल्स या कंपनीच्या रिअ‍ॅक्टरमध्ये सोल्व्हंट चार्ज करत असताना स्फोट झाल्याने पाच कामगार भाजले आहेत.

ऑनलाइन लोकमत

आवाशी, दि. 25 - खेड तालुक्यातील लोटे येथील सुप्रिया केमिकल्स या कंपनीच्या रिअ‍ॅक्टरमध्ये सोल्व्हंट चार्ज करत असताना स्फोट झाल्याने पाच कामगार भाजले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना ऐरोलीतील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.सुप्रिया केमिकल्समधील रिअ‍ॅक्टरमध्ये मंगळवारी रात्री सोल्व्हंट चार्ज करण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे तेथे काम करणारे पाच कामगार भाजले. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरातील ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी गोळा झाले. त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव होता. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला. या दुर्घटनेत भाजलेल्यांपैकी विजय, प्रितेश यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ऐरोलीतील नॅशनल बर्न हॉस्पिटलकडे हलवण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्या तिघांना लोटेतील परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.व्यवस्थापकाला घेरावगंभीर जखमी झालेल्या दोघांना ऐरोलीकडे हलवण्यात आले. मात्र त्यांच्यासोबत कंपनीचा एकही माणूस गेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाची भावना होती. रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कामगार तसेच ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापकांना घेराव घातला. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.