ठाणे : ठाणे परिवहनचा गाडा विविध कारणांमुळे गाळात खोलवर रुतला असतांनाच आता २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात १५ प्रकारचे गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. ताळेबदांनुसार विविध निधींची रक्कम व गुंतविलेली रक्कम यातील तफावत ही तब्बल ७६ कोटी ६६ लाख ३५ हजार ६०२ रुपये एवढी आढळून आली आहे.उत्पन्न आणि खर्च, अग्रीम रकमांचे समायोजन योग्य पद्धतीने न होणे, महसुली तूट कमी दाखविणे, आस्थापनेवरील खर्च हा शासन निर्देशापेक्षा जाद असणे, भविष्य निवार्ह निधीची रक्कम, निरनिराळ्या डिपॉझीट, साफसफाईची कामे, अपघात नुकसान भरपाई यासह इतर महत्त्वाचे व गंभीर आक्षेप नोंदवून ताशेरे ओढले आहेत. आता परिवहन प्रशासनाच्या भोंगळा कारभाराची चिरफाड लेखा परिक्षण विभागाने केली आहे. २०१३-१४ चा हा लेखा परिक्षण अहवाल सोमवारी परिवहन समितीसमोर सादर केला. (प्रतिनिधी)>उत्पन्न व खर्च व उपक्रमाच्या आर्थिक स्थितीबाबत परिहवहन सेवेच्या नफातोट्याचा ताळमेळ बसत नसून टीएमटीचे महसुली व इतर उत्पन्न हे ८६ कोटी ७७ लाख ०६ हजार ३६० एवढे असून महसुली खर्च मात्र तब्बल १२७ कोटी ०२ लाख २१ हजार ५०१ आहे. यामध्ये महसुली तूट ही तब्बल ४० कोटी २५ लाख १५ हजार १४१ एवढी नमूद केली आहे. विशेष म्हणजे, ती दाखवितांनासुद्धा निरनिराळ्या निधीच्या गुंतवणुकीवरील व्याजाची येणे रक्कम ३ कोटी ३२ लाख ९७ हजार ९३२ रुपये हे जमा म्हणून घेतलेली आहे.
परिवहनच्या कारभारावर ठपका
By admin | Updated: July 20, 2016 04:15 IST