शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून गोरेगाव येथे तरुणीवर ‘ब्लेडहल्ला’

By admin | Updated: March 7, 2017 05:06 IST

गोरेगावात एका १७ वर्षीय तरुणीवर ‘ब्लेडहल्ला’ झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला

गौरी टेंबकर-कलगुटकर,मुंबई- गोरेगावात एका १७ वर्षीय तरुणीवर ‘ब्लेडहल्ला’ झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याच्या रागात हा हल्ला करणाऱ्या माथेफिरूला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली आहे.शंकर भारद्वाज (१९) असे अटक करण्यात आलेल्या माथेफिरूचे नाव आहे. जो गोरेगाव पश्चिम परिसरातील रहिवासी आहे. यातील पीडित मुलगी पिंकी (नावात बदल) हीदेखील याच परिसरात राहते. हे दोघे एकमेकांना ओळखतात. महाविद्यालयात शिकत असलेल्या या मुलीवर भारद्वाजचे एकतर्फी प्रेम होते. मात्र तिने त्याला नकार दिला होता. तरीदेखील तो सतत तिचा पाठलाग करायचा. मध्यंतरी त्याने पिंकीला एका तरुणासोबत बोलताना पाहिले आणि त्याने तिला जाब विचारला. तेव्हा तिने त्याला पुन्हा नकार दिला आणि त्या दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा याचा सूड घेण्याचे भारद्वाजने ठरविले. बांगूरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पिंकी घरी परतत होती. तेव्हा भारद्वाजने तिला पुन्हा अडविले आणि प्रेमाबाबत विचारणा केली. तेव्हादेखील तिने त्याला थेट नाही असे सांगितले. ज्याचा भारद्वाजला प्रचंड राग आला आणि त्याने खिशातून धारदार ब्लेड काढत तिच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. जखमी अवस्थेत तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली तेव्हा तो घटनास्थळाहून पसार झाला. स्थानिकांनी पिंकीला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरने तिच्यावर उपचार केले. पिंकीच्या चेहऱ्यावरील जखमा गंभीर नसल्या तरी चेहऱ्यावरील ब्लेडच्या जखमांचे डाग हे कायम चेहऱ्यावर राहतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारद्वाजला बांगूरनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>आरोपी शंकर भारद्वाज सतत तरुणीचा पाठलाग करायचा. रविवारी पिंकी घरी परतत असताना त्याने खिशातील ब्लेड काढून तिच्यावर वार केले.