शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

डॉक्टरवर ब्लेडने वार

By admin | Updated: April 11, 2017 01:26 IST

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना सुरक्षा पुरविली होती. मात्र सुरक्षा पुरवूनही डॉक्टर असुरक्षित असल्याचे चित्र मुंबईत आहे. डॉक्टर लक्ष देत

मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना सुरक्षा पुरविली होती. मात्र सुरक्षा पुरवूनही डॉक्टर असुरक्षित असल्याचे चित्र मुंबईत आहे. डॉक्टर लक्ष देत नाही म्हणून नशेखोर रुग्णाने सिझरिंग ब्लेडने डॉक्टरवर वार केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री केईएम रुग्णालयात घडली. डॉ. तरुण चंद्रकांत शेट्टी (२६) या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी आरोपी रुग्ण सुनील सोमा भामळे (२२) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामळे हा शिवडीचा रहिवासी आहे. रविवारी दारूच्या नशेत मित्रांसोबत झालेल्या भांडणात तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी डॉ. शेट्टीने त्याची तपासणी केली. मात्र शेट्टी आपल्याकडे लक्ष देत नसल्याच्या रागात भामळेने ओपीडीतील सिझरिंग ब्लेडने त्याच्यावर वार केले. शेट्टी यांच्या सतर्कतेमुळे तो वार त्यांच्या हातावर लागला. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली. अन्य डॉक्टरांसह सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. शेट्टींवर उपचार करत याबाबत भोईवाडा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या भोईवाडा पोलिसांनी भामळेला अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. (प्रतिनिधी)शासकीय यंत्रणांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे रुग्णालयात पूरक सुरक्षा यंत्रणा आहे. तसेच रुग्णालयाच्या संवेदनशील भागात अलार्म सिस्टीमही लावण्यात आली आहे. डॉ. तरुण शेट्टी यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ रुग्णाने दारूच्या नशेत केला आहे. हल्ल्याविषयी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.- डॉ. अविनाश सुपे, केईएम, अधिष्ठाता