शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

‘ब्लॅक मनी’ शुद्धीकरणाचा मार्ग सुकर ?

By admin | Updated: November 19, 2014 05:13 IST

एकीकडे देशाला विकासकामांसाठी पैशांची तातडीची गरज आहे आणि दुसरीकडे बचतीचा दरही खालावल्यामुळे सुवर्णमध्य साधत

मनोज गडनीस, मुंबईएकीकडे देशाला विकासकामांसाठी पैशांची तातडीची गरज आहे आणि दुसरीकडे बचतीचा दरही खालावल्यामुळे सुवर्णमध्य साधत केंद्र सरकारने आज ‘किसान विकास पत्र’ योजना पुन्हा सादर केली खरी, पण या गुंतवणुकीत ‘पॅन कार्ड’ सक्तीचे नसल्याने आणि या करपात्र योजनेत मुदतपूर्तीनंतर ‘टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स’ची व्यवस्था नसल्याने या योजनेच्या माध्यमातून काळा पैशाच्या गुंतवणुकीचा मार्ग पुन्हा प्रशस्त होणार  असल्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. १९८८ ते २०११ या कालावधीत लोकप्रिय योजना म्हणून 'किसान विकास पत्र' योजनेचा बोलबाला होता. परंतु, सरकारी गुंतवणुकींच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी २०१० मध्ये तत्कालिन संपुआ सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर श्यामला गोपीनाथन् यांच्या अध्यतेखाली जी समिती नेमली होती, त्या समितीने किसान विकास पत्र म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचे साधन झाल्याचे मत नोंदविले होते. यानंतर, २०११ मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. मात्र, विकास, बचत आणि छोट्या गुंतवणूकदारांना हक्काचे साधन अशी कारणे देत केंद्र सरकारने ही योजना आज सादर केली. परंतु, त्यात काही कच्चे दुवे असल्याने या योजनेत काळ््या पैशाची गुंतवणूक होऊ शकते. या संदर्भात चार्टर्ड अकाऊटंट उमेश शर्मा म्हणाले की, या योजनेतील गुंतवणुकीकरिता जी कागदपत्रे सादर करायची आहेत, त्यात पॅन कार्ड बंधनकारक नाही. पॅन कार्ड ही प्रत्येक व्यक्तीची आर्थिक कुंडली आहे. जर गुंतवणुकीच्याच वेळी हा क्रमांक देणे बंधनकारक केले तर ही एक 'फुलप्रूफ' योजना ठरली असती. तसेच, दुसरा मुद्दा म्हणजे ही योजना मुदतीअंती करपात्र आहे. अशा स्थितीत गुंतवणूकादाराच्या हाती त्याचा परतावा देताना कर कापून देणे अपेक्षित आहे. परंतु, त्याचीही तरतूद यात नसल्याने गुंतवणूकदार स्वत:हून कर भरतील, अशी आशा करावी लागेल. तसे न केल्यास एकप्रकारे सरकारचेच नुकसान होणार आहे.