शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्य प्रसाधनांचा ‘काळा’ बाजार

By admin | Updated: April 6, 2016 05:21 IST

मुंबईसारख्या शहरात नामवंत ब्रॅण्डेड सौंदर्यप्रसाधनांची ‘कॉपी’ करून त्या नावाखाली भेसळयुक्त दुय्यम सौंदर्यप्रसाधने स्वस्तात विकण्याचा धंदा तुफान तेजीत आहे.

मनीषा म्हात्रे, पूजा दामले ,  मुंबई मुंबईसारख्या शहरात नामवंत ब्रॅण्डेड सौंदर्यप्रसाधनांची ‘कॉपी’ करून त्या नावाखाली भेसळयुक्त दुय्यम सौंदर्यप्रसाधने स्वस्तात विकण्याचा धंदा तुफान तेजीत आहे. शहरातील विविध मार्केटमध्ये, रेल्वेत या बोगस सौंदर्य प्रसाधनांची विक्री सर्रास सुरू आहे. या धंद्यात अक्षरश: कोट्यवधींची उलाढाल होत आहे. सौंदर्यप्रसाधने विकण्यासाठी सध्याच्या घडीला कोणत्याही प्रकारची नोंदणी आवश्यक नाही. ब्रॅण्डेडच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या या काळ््याधंद्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून उघड झाले. ‘लोकमतच्या प्रतिनिधींनी क्रॉफर्ड मार्केट, दादर रानडे रोड, वांद्रे लिंक रोड, मालाड पश्चिम आणि मुलुंड आरटीटी मार्केटमधील विक्रेत्यांशी संवाद साधला. त्यात हा सौंदर्यप्रसाधनांचा धंदा कसा चालतो? याविषयी धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य म्हणजे गिऱ्हाईक फक्त एकदाच ‘बॅ्रण्ड’चे नाव पाहतो. आणि ‘कस्टमचा माल’ म्हणून मूळ किमतीपेक्षा कमीला माल मिळतो, असे म्हटल्यावर हुरळून जात खरेदी करतो. ‘कस्टमचा माल’ किंवा ‘ड्यूटी फ्री’ म्हणून विकल्या जाणाऱ्या रस्त्यावरच्या मालाचे वास्तव धंद्यापेक्षा भयावह आहे. विमान अथवा जहाजातून माल आल्यानंतर गोदामात साठवून ठेवला जातो. तिथून या मालाची चोरी केली जाते. या चोरीत पोलिसांचा, कस्टमच्या अधिकाऱ्यांचाही वाटा असतो. आणि हाच माल बाहेर आणून त्यात भेसळ करून ‘ब्रॅण्डेड’ माल म्हणून बाजारात थाटला जातो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. एका रात्रीत कंटेनर खाली करण्यासाठी पोलिसांना २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागतात. तर, दुसरीकडे रस्त्यावर धंदा चालवण्यासाठी दरमहा विविध भागात ५ ते १५ हजार रुपये द्यावे लागतात. रस्त्यावर सौंदर्यप्रसाधने विकणाऱ्यांचा एक दिवसाचा धंदा हा ५ ते १५ हजार रुपये आहे.सौंदर्यप्रसाधने उत्पादन करण्याचा परवाना राज्यात सुमारे १ हजार जणांकडे आहे. मात्र, त्यापेक्षाही अधिक ठिकाणी परवान्याशिवाय बनावट सौंदर्यप्रसाधने बनवण्याचे छोटे कारखाने घरात, झोपड्यांमध्ये सुरू आहेत. असे आहे रेट कार्ड मॅबलिन काजळ मूळ किंमत : १९९ रुबोगस उत्पादन किंमत : १२०-१५० रु.५० काजळ घेतल्यास : ६० रु. लॅकमे आयकॉनिक मूळ किंमत : २१० रु. बोगस उत्पादन किंमत : १२० रु.५० काजळ घेतल्यास : ८० रु.