शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

बीकेसीत हायब्रीड बससेवा लवकर

By admin | Updated: December 26, 2014 04:30 IST

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)मध्ये पर्यावरणाला पूरक ठरणारा बससेवा प्रकल्प आता एक पाऊल पुढे सरकला आहे.

जमीर काझी, मुंबई वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)मध्ये पर्यावरणाला पूरक ठरणारा बससेवा प्रकल्प आता एक पाऊल पुढे सरकला आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या उपक्रमामध्ये परिसरात विविध तीन रेल्वे स्टेशनपासून बीकेसीपर्यंतच्या बसमार्गाचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध पाच कंपन्यांनी या मार्गावर संकरित (हायब्रीड) बसेस पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. पूर्णपणे इलेक्ट्रिक किंवा डिझेलवर चालणाऱ्या अथवा दोन्हींचा समावेश असलेल्या बसेस असणार आहेत. बससेवा पुरविण्याबाबत काही कंपन्यांनी प्राथमिक सादरीकरण मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केले आहे. नव्या वर्षामध्ये त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्राधिकरणातील सूत्रांकडून सांगण्यात आले. कुर्ला, सायन आणि वांद्रे या तीन उपनगरीय स्थानकापासून बीकेसीपर्यंत प्रदूषणविरहित बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुकीची कोंडी व वाढत्या प्रदूषणापासून नागरिकांची सुटका होणार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत बीकेसीचा परिसर हा वाणिज्यिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, विविध क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे जाळे या ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एमएमआरडीएने नोव्हेंबर २०११मध्ये स्वत:च्या बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विविध कारणांमुळे हा प्रकल्प प्रलंबित राहिल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत राहिल्याने तो मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार प्राधिकरणाने केलेल्या आवाहनानुसार काही दिवसांपूर्वी बसचे उत्पादन करणाऱ्या काही कंपन्यांनी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी. मदान यांच्यासमोर संकरित बसेसचे सादरीकरण केले. त्यांनी इलेक्ट्रिकवर चालणारी किंवा डिझेलवरील तसेच दोन्ही प्रकारच्या बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. प्राधिकरणाच्या प्राथमिक नियोजनानुसार २५ आणि ४० सीटच्या बसेस वापरायचे ठरविले आहे. त्याचे तिकीट वाहकांकडून किंवा बसमध्ये तिकीट काढण्याचे यंत्र बसविले जाणार आहे. जानेवारीच्या मध्यावर त्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले.