शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
4
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
5
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
7
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
8
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
9
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
10
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
11
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
12
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
13
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
14
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
15
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
16
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
17
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
18
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
19
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
20
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

''भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदीही ओबीसी, फक्त त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही''  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:03 IST

गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये ओबीसी नेते प्रचंड अस्वस्थ आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये ओबीसी नेते प्रचंड अस्वस्थ आहेत. ओबीसी आणि बहुजन नेत्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. सध्या ओबीसी नेत्यांनीही भाजपा नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी ओबीसींना खरंच डावललं जात आहे का, यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. खरं तर आमदारांची जात बघायची नसते. पण आमच्या 105 निवडून आलेल्या सदस्यांपैकी 35 मराठा समाजाचे आहेत. 37 ओबीसी समाजाचे आहेत. 18 एससी-एसटी समाजाचे आहेत. सात खुला प्रवर्गातील आहेत.भाजपामध्ये पहिल्यापासून ओबीसी समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. ओबीसी समाजालाही भाजपा हा आपला पक्ष वाटतो. भाजपाचे सर्वोच्च नेते आणि पंतप्रधान मोदीजी हे ओबीसी आहेत. ते कधी सांगत नाही, भांडवल करत नाही. हेसुद्धा लक्षात घ्यावं लागेल. कोणीही असं नसतं की ज्याची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. मी गेलो तरी पक्षाचं काही अडणार नाही.  नेतृत्वानं माझ्यावर विश्वास ठेवला. मी त्यांचा आभारी आहे. पण नेतृत्वाकडे दुसरा पर्यायच नाही, असं मला बिलकुल वाटत नाही. पर्याय तयार करता येतो. पर्याय त्या ठिकाणी कोणीही असू शकतं, असंही फडणवीस म्हणाले आहेत. मुंडे साहेबांना प्रकाश शेंडगेंनी किती त्रास दिला हे जगजाहीर आहे. इतके बोलले की चारचौघांत अपमानित केलं. मुंडे साहेबांनी हे स्वतः मला खासगीत सांगितलेलं आहे. ते नेते जर सांगत असतील भाजपाने काय करावं, तर त्यांना अधिकार नाही. आमचे नेते त्यांच्या मनातल्या गोष्टी पक्षात सांगतील. बेईमानी करून बाहेर जाणार नाही. 

आमचे 'ते' 12 आमदार कुठेही जाणार नाहीत

तीन पक्ष एकत्र आल्यानंतर 12 आमदार कशाला भाजपामधून फुटून जातील, कोणावर विश्वास ठेवून जातील. ज्यांना सरकारचे मंत्री ठरवता येत नाही. त्यांच्या विश्वासावर हे आमदार फुटून जाणार नाहीत. हे सरकार किती दिवस चालेल हे कोणीही सांगू शकत नाही. हे अंतर्विरोधानं भरलेलं सरकार आहे. देशामध्ये असं सरकार कुठेही चाललं नाही. देशाच्या इतिहासात इतकं अंतर्विरोध असलेलं सरकार चालल्याचं मला दाखवा. राष्ट्रवादीवाले सोयीप्रमाणे कुठेही फिट होतात. त्यांना सोयीप्रमाणे कुठलीही भूमिका घेता येते. पण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं यापेक्षा दुर्दैवं काय असू शकतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस