शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या आंदोलनावर भाजपाची कडी

By admin | Updated: May 17, 2016 01:59 IST

तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुपे तलावात जनाई-शिरसाई उपसासिंचन योजनेतून पाणी सोडावे

बारामती : तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुपे तलावात जनाई-शिरसाई उपसासिंचन योजनेतून पाणी सोडावे, या मागणीसाठी (मंगळवारी) रास्ता रोको आंदोलनाची तयारी केली आहे. त्यांच्या या आंदोलनावर कडी करून भाजपाच्या नेत्यांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून सिंचन योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले. तसे आदेश पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर त्यांनी वरवंड येथील तलावाची पाहणीदेखील केली. बारामती तालुक्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे, या स्थितीत सुपे परगण्यातील गावांसाठी जनाई-शिरसाई उपसासिंचन योजनेतून पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज (मंगळवारी) सुपे चौकात रास्ता रोको आंदोलनाची तयारी केली होती. त्यांच्या या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी भाजपाचे नेते पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीपराव खैरे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन मंगळवारीच वरवंड तलावातून सुपे तलावासह उपसासिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या तलावात पाणी सोडण्याची मागणी केली. त्यांनी तातडीने बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. मंगळवारीच जनाई-शिरसाई योजनेतून पाणी सोडण्यात येणार असल्याचे खैरे यांनी सांगितले, तर या योजनेतून पाणी सोडण्यासाठी आम्ही अगोदरदेखील मागणी, आंदोलन केले आहे. आमच्या आंदोलनामुळेच पाणी सोडण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>राष्ट्रवादीकडून टँकरच्या पाण्याचे नियोजनराष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकताच दुष्काळी दौरा केला. त्यामध्ये टॅँकरचे पाणी प्रतिमाणसी कमी पडते, असा नागरिकांचा सवाल होता. त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या बारामती सहकारी दूध संघ, श्रायबर डायनामिक्स डेअरी कंपनी, सोमेश्वर येथील अक्षय फाऊंडेशनच्या वतीने २१ गावांमध्ये दिवसाआड २२ हजार लिटरप्रमाणे पाणीवाटपाचे नियोजन केले आहे. त्याचा प्रारंभ नुकताच झाला. त्यासाठी टॅँकरचे नियोजन अजितदादा मोटार वाहतूक संघाने केले आहे. >शिवसेनेच्या वतीने मोफत टँकर सुरूशासकीय टॅँकरने पाणी देण्याचे नियोजन केलेले असतानाच राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेनेदेखील मोफत टॅँकरने पाणी देण्याचे नियोजन आजपासून केले आहे. शिवसेनानेते बाबासाहेब धुमाळ, अ‍ॅड. राजेंद्र काळे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र पिंगळे यांच्या उपस्थितीत टॅँकर सुरू करण्यात आला.