शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या घसरत्या भावाचा नगरला भाजपाला फटका

By admin | Updated: February 27, 2017 05:05 IST

कांद्याच्या घसरत्या भावाचा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला फटका बसला आहे.

अहमदनगर : कांद्याच्या घसरत्या भावाचा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मतपेटीतून राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केल्याने पक्षाच्या ‘फोर्टी प्लस’च्या महत्त्वाकांक्षेचा वांदा झाला.संपूर्ण देशाला कांदा पुरवणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आता मावळत चालला आहे. त्यात नाशिक खालोखाल नगर जिल्हा आघाडीवर आहे. कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधारवड ठरू लागल्याने जिल्ह्यात गेल्या वर्षभरात कांदा उत्पादनात कमालीची वाढ झाली. ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा कमी पाणी, लागवड खर्च कमी म्हणून कांदा लागवडीकडे वळले. जिल्ह्यात यंदाच्या मोसमात सुमारे १५ लाख टन इतके उत्पादन झाले. मात्र दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमीळनाडू तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांतही यावर्षी कांदा उत्पादन वाढले. परिणामी कांद्याची देशांतर्गत मागणी घटली. त्याचा परिणाम भावावरही झाला. वर्षभरापासून कांदा ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. लागवडीसाठीचा खर्च पाहता सध्याचे भाव शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.शेतकऱ्यांनी जि. प. च्या निवडणुकीत मतपेटीतून त्यावर नाराजी व्यक्त केल्याचे चित्र आहे. मोठ्या शहरांत भाजपाला यश मिळाले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकप्रियतेत मात्र घट झाल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)