शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

By admin | Updated: October 17, 2014 01:06 IST

भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा दिला. गृह मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही, त्यातच नाईलाजाने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देणे या दोन

गृह मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसल्याची खंतनागपूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा दिला. गृह मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही, त्यातच नाईलाजाने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देणे या दोन बाबी त्यांनी राजीनाम्यासाठी पुढे केल्या आहेत.भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी राजीनामा पाठविला. या राजीनाम्याची प्रत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, श्रीकांत देशपांडे, भाजपचे प्रदेश सचिव चंद्रशेखर बावनकुळे, सहसंघटनमंत्री किशोर रेवतकर यांच्याकडेही पाठविल्या आहेत. पोतदार यांनी प्रदेशाध्यक्षाकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, आपण कळमेश्वर तालुका कार्यकारिणी सदस्य ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंतच्या जबाबदारी गेल्या २२ वर्ष निष्ठेने सांभाळल्या. यावेळी सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची खात्री असताना सोनबा मुसळे यांना उमेदवारी दिली. तरीही त्यांच्यासाठी भाजपचे संघटन करून जोरदार कामाला सुरुवात केली. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. या मतदारसंघातून डमी उमेदवाराचा अर्ज भरला नसल्याने तसेच बी. फॉर्मचा उल्लेख केला नसल्याने आमच्याकडे पक्षाचा उमेदवारच राहिला नाही. नागपूर जिल्ह्याचे स्वत:कडे प्रतिनिधित्व असताना स्वत:च्याच मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसणे ही खेदजनक बाब आहे. उमेदवार नसल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आग्रह धरला. त्यानुसार पाठिंबा देत शिवसेना उमेदवारामागे शक्ती उभी केली. या दोन बाबींची नैतीक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. सोबतच पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)