शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत ‘भाजपा’चे लोकसेवक आघाडीवर

By admin | Updated: February 4, 2015 02:25 IST

आघाडी सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराची ओरड करत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीचेच लोकसेवक लाच घेण्यात इतर राजकीय पक्षांपेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे.

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरआघाडी सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराची ओरड करत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीचेच लोकसेवक लाच घेण्यात इतर राजकीय पक्षांपेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात १९ पदाधिकाऱ्यांना (‘इतर लोकसेवक’ या व्याख्येत मोडणारे) लाच घेताना घेताना पकडले. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक पाचजण आहेत. राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेच्याही प्रत्येकी तिघांनी लाच घेतली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ या वर्षात १९ सरपंच-उपसरपंचांसह इतर १९ लोकसेवकांनी लाच घेतली. त्यामध्ये १२ महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहेत.कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना ३० जानेवारीस सोळा हजारांची लाच घेताना पकडले. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्याने शिवसेना व भाजपाने महापालिका बरखास्त करण्याची मागणीकेली आहे. परंतु, या सध्याच्या सत्ताधारी पक्षांचे पायदेखील मातीचेच असल्याचे आकडेवारी सांगते. तक्रारींमध्ये सातत्याने वाढभ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गेल्या चार वर्षांत दुप्पट वाढ झाली आहे. २०१० ला राज्यात ४८६ प्रकरणे झाली होती. २०१४ ला ही संख्या १२४५ वर गेली. गेल्या वर्षात ३ अध्यक्ष, ४ सभापती, १० नगरसेवक आणि १९ सरपंच-उपसरपंचांना लाच घेताना रंगेहात पकडले. पूर्वी लोक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. आता लोकजागृतीमुळे ते धाडसाने पुढे येत आहेत. - लक्ष्मण जगदाळे, पोलीस निरीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईलाचखोर ‘लोकसेवकां’ची पक्षनिहाय संख्याभाजप : ०५राष्ट्रवादी : ०३काँग्रेस : ०३शिवसेना : ०३शेकाप : ०१मनसे : ०१अपक्ष (स्थानिक पक्ष) : ०२इतर : ०१इतर लोकसेवक म्हणजे कोण?जे लोक शासकीय सेवांचा लाभ घेतात व मानधनही स्वीकारतात, अशांना ‘इतर लोकसेवक’ असे म्हटले जाते. त्यांनी प्रत्यक्ष, सरकारी स्वीय सहायक अथवा खासगी व्यक्तीमार्फत लाच घेतली तरी त्यांच्यांवर कारवाई होऊ शकते. कोल्हापूरच्या महापौरांवर याच तरतुदीन्वये कारवाई झाली आहे.