शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जवळा गटात भाजपाची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: February 18, 2017 15:10 IST

जवळा गटात भाजपाची प्रतिष्ठा पणाला

जवळा गटात भाजपाची प्रतिष्ठा पणालासांगोला : जवळा जि. प. गटात आघाडी, महायुती व अपक्ष उमेदवारात तिरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे यांचे वर्चस्व असलेल्या जवळा जि़ प़ गटाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. कारणही तसेच असून भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी महायुतीच्या कोट्यातून हा गट आपल्याकडे घेतल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आघाडी व महायुतीच्या उमेदवाराला रेश्मा बनसोडे किती आव्हान देतात हेही औत्सुक्याचे ठरणार आहे. या गटातून जि. प. सदस्या जयमाला गायकवाड यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद व जि. प. अध्यक्ष होण्याचा मान मिळाला़ भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनाही या गटातून बिनविरोध होण्याची संधी मिळाली होती. असे असले तरी सध्याचे चित्र वेगळे आहे़ यंदाच्या निवडणुकीत जवळा गटाची पुनर्रचना झाली असून जवळा वगळता जवळा गणात नवीन गावे व वाढेगाव गण नव्याने समाविष्ट झाला आहे. जवळा जि. प. गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव तर जवळा गण सर्वसाधारण महिला व वाढेगाव गण सर्वसाधारण जागेसाठी आहे. जि. प. च्या निवडणुका जाहीर होताच नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी व शेकापने आघाडी करून निवडणुका लढविण्याचे जाहीर केले़ इकडे महायुतीने नगरपालिका निवडणुकीतील महायुती कायम ठेवून श्रीकांत देशमुख यांनी जवळा गट भाजपकडे घेतला आहे. माजी आ. दीपक साळुंखे यांनी चाणाक्ष राजकारणातून स्वाती तुळशीराम कांबळे यांना उमेदवारी दिली़ जवळा गणातून आघाडीकडून सरिता कृष्णदेव साळुंखे व वाढेगाव गणातून नारायण शिवाजी जगताप यांना उमेदवारी देऊन गटात राजकीय डावपेच आखले आहेत. ---------------------------महायुतीला आव्हानमहायुतीकडून मंगल प्रभाकर कसबे यांना उमेदवारी देऊन आघाडीला आव्हान दिले आहे. तर याच गटातून रेश्मा प्रभाकर बनसोडे यांचेही आव्हान असणार आहे. जवळा गणातून महायुतीने महानंदा लक्ष्मण खंडागळे या आयात उमेदवाराला उमेदवारी देऊन आघाडीशी बरोबरी साधली आहे. वाढेगाव गणातून महायुतीने मेथवडेचे माजी सरपंच जगदीश पाटील या तुल्यबळ उमेदवाराला उमेदवारी देऊन आघाडीपुढे आव्हान ठेवले आहे. याच गणातून कोमल तारळेकर, सुरेखा वाळके या दोन अपक्ष महिला आघाडी व महायुतीला किती आव्हान देतात, हेही औत्सुक्याचे ठरणार आहे.