नवी मुंबई : भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. याबाबतची घोषणा आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवारी बेलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी भाजपाच्या नवीन, जुन्या तसेच सर्वच स्तरातील कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. आमदार म्हात्रे यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना जोमाने काम करण्यासाठी कामाच्या नियोजनाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला, तसेच मार्गदर्शनही केले.पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या नवी मुंबई भारतीय जनता पक्षाची नवीन कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी दादा मतलापूरकर,अब्दुल हमीद, शशी भानुशाली, विजय घाटे, राजाराम पाटील, अॅड. सुहास वेखंडे, विक्रम पराजुली, कीर्ती राणा, सुषमा दंडे, सरस्वती पाटील, संपत शेवाळे, जगन्नाथ जगताप, उदयवीर सिंग यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष गोपाळ गायकवाड तर महामंत्रीपदी नीलेश म्हात्रे, एकनाथ मगडवार, डॉ. राजेश पाटील, कृष्णा पाटील यांची निवड झाली आहे. सचिवपदी संपत शेट्टी, दामोदर पिल्ले, सुनील होनराव, प्रकाश महाडिक, विकास झंजाड, श्याम राठोड, वासेराम राजपूत, मुक्ता बोहरा, मीना दरवेज, सुनील कुमार, रमेश मुळे, प्रमिला खडसे, रमेश मदेशिया आणि कार्यालय मंत्री प्रवीण पाटील यांचा समावेश आहे.
भाजपाची नवीन कार्यकारिणी
By admin | Updated: June 10, 2016 02:57 IST