शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मुंबईवगळता नऊ पालिकांत भाजपाला सर्वाधिक मतदान

By admin | Updated: February 28, 2017 05:06 IST

मुंबईवगळता अन्य नऊ महापालिका निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक म्हणजे एकूण वैध मतांच्या ३५.३६ (८१,१७,२८९) टक्के मते मिळाली.

मुंबई : मुंबईवगळता अन्य नऊ महापालिका निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक म्हणजे एकूण वैध मतांच्या ३५.३६ (८१,१७,२८९) टक्के मते मिळाली. शिवसेनेचा दुसरा क्रमांक असला तरी या पक्षाला भाजपाच्या जवळपास निम्मी म्हणजे १८.१३ (४१,६१,०५२) टक्के मते मिळाली. मुंबईमध्ये शिवसेनेने २२७ जागा लढविल्या आणि ८४ जिंकल्या. या पक्षाच्या सर्व उमेदवारांना एकत्रित २८.८३ टक्के (१४,४६,४२८) मते मिळाली. त्याखालोखाल भाजपाला २७.९२ टक्के (१४,००,५००) इतकी मते मिळाली. मुंबईत तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे १६.५४ टक्के (८,२९,८९४) मते काँग्रेसने मिळवली. जिल्हा भाजपाला सर्वाधिक तर दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीला मिळाली. काँग्रेस तिसऱ्या तर शिवसेना चवथ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेने संपूर्ण लक्ष मुंबई पालिकेवर केंद्रित केले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिपच्या प्रचारासाठी एकही सभा घेतली नाही. तर पक्षाचे अन्य मोठे नेतेदेखील या निवडणुकीकडे फारसे फिरकले नाहीत. त्याचा फटका सेनेला ग्रामीण भागात बसला. महापालिकांबरोबर जिल्हा परिषदांमध्येही भाजपाने पहिल्यांदाच क्रमांक १ची मते मिळविली. मुख्यमंत्र्यासह संपूर्ण पक्षाने महापालिकांबरोबरच जिल्हा परिषद निवडणुकीवरही तेवढेच लक्ष केंद्रित केले होते. (विशेष प्रतिनिधी)>227 प्रभागांच्या मुंबई महापालिकेत सर्वाधिक २८.८३ टक्के मते शिवसेनेला पडली असली तरी त्यापेक्षा एक टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे ०.९१ टक्के कमी मते भाजपाला पडली आहेत.>मुंबईत असे झाले मतदानराजकीय पक्षमिळालेली मतेमतांची टक्केवारीशिवसेना१४४६४२८२८.८३भाजपा१४००५००२७,९२काँग्रेस८२९८९४१६.५४मनसे३९५०४७७.८८अपक्ष२८३२९३५.६५राष्ट्रवादी२४८५६६४.९६अन्य१२७८२८२.५५एमआयएम१२७७४०२.५५समाजवादी पार्टी१११२९१२.२२बसपा४५७९६०.९१>नऊ महापालिका(नागपूर, अकोला, अमरावती, पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर)राजकीय पक्षमिळालेली मतेटक्केवारीभाजपा८११७२८९३५.३६शिवसेना४१६१०५२१८.१३राष्ट्रवादी३४१७०७२१४.८८काँग्रेस३०१६८३२१३.१४अपक्ष१२१५७२०५.३०मनसे९०९६३२३.९६बसपा७६७२७८३.३४एमआयएम४४९३७३१.९६अन्य९०२७८३३.९३>जिल्हा परिषदांमधील प्रमुख पक्षांचे मतदानराजकीय पक्षमिळालेली मतेमतांची टक्केवारीभाजपा ६३७६०५४२४.९१राष्ट्रवादी५६९३६९४२२.२५काँग्रेस४९७२२७२१९.४३शिवसेना४७३९९७६१८.५२अपक्ष१३६०६६१५.३२