ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसच्या उमेदवारानेही अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या हरिभाऊ बागडे यांची विधानसभाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मतं फुटण्याच्या भीतीने काँग्रेस व सेनेने माघार घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हरिभाऊ बागडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने आमचे उमदेवार विजय औटी यांनी आपला उमदेवारी अर्ज मागे घेतला आहे असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केले. त्यानंतर थोड्याच वेळात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी आपला अर्ज मागे घेत या निवडणुकीतून माघार घेतली. तीनपैकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपा उमेदवार हरिभाऊ बागडे हेच नवे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत.