शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले

By admin | Updated: March 7, 2017 01:05 IST

महापालिकेतील भाजपाच्या गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सोमवारी केली.

पुणे : महापालिकेतील भाजपाच्या गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सोमवारी केली. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष बनलेल्या भाजपाचा गटनेता म्हणून भिमाले हे सभागृह नेत्याची भूमिका पार पाडतील. भाजपाच्या ९३ सदस्यांची मंगळवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे नोंदणी करण्यात येणार आहे.भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक रविवारी पक्षाचे निरीक्षक व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी त्यांनी पक्षाचे गटनेते व महपौरपदी कोणाची निवड करावी, याबाबत नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार भिमाले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सभागृहात पक्षाच्या नगरसेवकांची १०० टक्के उपस्थिती राहील तसेच सभागृहाचे गांभीर्य कायम राहावे यासाठी प्रयत्न करेन, असे भिमाले यांनी सांगितले. सभागृहाच्या माध्यमातून शहराचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)भिमाले यांचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झालेले आहे. त्यांची १९९८मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कोशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते २००२मध्ये पहिल्यादां डीएडी कॉलनीतून महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. २००७मध्ये त्यांच्या पत्नी वंदना भिमाले या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये भिमाले पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१२मध्ये त्यांना स्थायी समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. २०१३मध्ये प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. नुकत्याच झालेल्या २०१७च्या निवडणुकीत त्यांनी तिसऱ्यांना विजय मिळविला आहे. ज्येष्ठतेनुसार त्यांना पक्षाच्या गटनेतेपदी निवडण्यात आले आहे.