शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजपची अनुकूलता म्हणजे निव्वळ ‘फार्स’

By admin | Updated: March 9, 2017 16:48 IST

शेतकरी कर्जमाफीसाठी भारतीय जनता पक्ष अनुकूल असल्याचा दावा म्हणजे निव्वळ एक‘फार्स’ आहे. कर्जमाफीची

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9  -  शेतकरी कर्जमाफीसाठी भारतीय जनता पक्ष अनुकूल असल्याचा दावा म्हणजे निव्वळ एक‘फार्स’ आहे. कर्जमाफीची मागणी मान्य असेल तर सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज राज्य सरकारला दिले आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज ठप्प झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " प्रारंभी भारतीय जनता पक्ष कर्जमाफीच्या विरोधात होता. परंतु, शेतकरी आणि विरोधी पक्षांमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफी करू, असे सांगू लागले आहेत. परंतु, ही योग्य वेळ येणार तरी केव्हा? कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी सरकार दिल्लीच्या आदेशाची प्रतीक्षा करते आहे की नागपूरच्या?"  
"सरकारने तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी, अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी आहे. शिवसेनाही या मागणीसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता कर्जमाफीची घोषणा करावी. वेळकाढूपणा करून अधिक शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करू नये,"  असेही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
तत्पूर्वी गुरूवारी सकाळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. तीच आक्रमकता विधानसभेतही दिसून आली. काँग्रेस-राष्ट्रवादीने कर्जमाफीच्या तात्काळ घोषणेसाठी सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे सभागृहाचे कामकाम तीन वेळा ठप्प झाले व त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.