शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ वैधानिक मंडळावर भाजपचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2015 01:24 IST

विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पहिल्यांदाच अध्यक्ष निवडीची परंपरा भंगणार असल्याची चिन्हे आहेत.

नागपूर : विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पहिल्यांदाच अध्यक्ष निवडीची परंपरा भंगणार असल्याची चिन्हे आहेत. हे मंडळ मुख्यमंत्र्यांच्या जिव्हाळ्याचे असल्याने, यावेळी भाजपमधील अभ्यासू व्यक्तिची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विदर्भात भाजपाच्या तुलनेत सेनेकडे अल्पबळ असल्याने, सेनेचा जोर कमी पडतो आहे. तर भाजपाच्या फळीतील दावेदाराचा दावा अधिक मजबूत होत आहे. अध्यक्षपदावरून प्रकाश डहाके पायउतार झाल्यानंतर हे पद दीड वर्षांपासून रिक्तच आहे. हे मंडळ बरखास्त होईल, अशी भीती व्यक्त होत असताना, मुख्यमंत्र्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने, २०२० पर्यंत मंडळाला जीवनदान मिळाले. मुख्यमंत्र्यांनी नवीन सदस्यांची नियुक्ती करताना तरुणांना संधी दिली. शिवाय मंडळाच्या नावातून वैधानिक काढून विदर्भ विकास मंडळ ही नवी ओळख दिली. आता मंडळावर फक्त अध्यक्षाचीच निवड व्हायची आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यामुळे नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या हालचालींनी मंत्रालयात वेग धरला आहे. परंपरेनुसार मुंख्यमंत्री ज्या पक्षाचा असतो, त्या पक्षासोबत सत्तेत असलेल्या मित्रपक्षाला या मंडळाचे अध्य क्षपद दिले जाते. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद होते तर राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, तुकाराम बिडकर, प्रकाश डहाके यांना या मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. यावेळी मात्र ही परंपरा भंगणार असल्याचे चित्र आहे. या पदासाठी शिवसेनेची दावेदारी कमजोर पडते आहे. विदर्भात शिवसेनेचे केवळ चार आमदार आहे. त्यातही एकाला राज्यमंत्रिपदाचा मान मिळाला आहे. तुलनेत भाजपामधून उघडपणे दावेदारी होत नसली तरी, इच्छुकांची भरपूर मांदियाळी आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, आपापल्या जवळच्यांना हाताशी धरले आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, अशा नाराजांचीही संख्या बरीच आहे. मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदाचा निवडीचा निर्णय प्रतिष्ठेचा केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री आमदार असताना विदर्भ विकास मंडळाने केलेल्या अभ्यासाचे दाखले देत, सभागृहात सत्ताधाऱ्यांची त्रेधा तिरपट उडवायचे. येथे सूज्ञ, अभ्यासू आणि विदर्भातील समस्यांची जाण असणाराच अध्यक्ष त्यांना हवा आहे. त्यामुळेच अध्यक्षपदाची नियुक्ती प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)