शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची अशीही घराणेशाही

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी दोन दिवसांपूर्वी जाहीर झाली, पण या कार्यकारिणीत नेत्यांचे पुत्र आणि कन्यांचा भरणा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी दोन दिवसांपूर्वी जाहीर झाली, पण या कार्यकारिणीत नेत्यांचे पुत्र आणि कन्यांचा भरणा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष यांना सरचिटणीसपद देण्यात आले आहे. आणखी एक सरचिटणीस प्रवीण दटके हे नागपूरचे महापौर असले तरी त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहेच. त्यांचे वडील नागपूर भाजपाचे अध्यक्ष होते. उपाध्यक्षपद मिळालेले खामगावचे (जि. बुलडाणा) आमदार आकाश फुंडकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आहेत. हेच पद मिळालेले आ. तुषार राठोड यांचे वडीलही आमदार होते. याच पदावर वर्णी लागलेले अमरावती जिल्ह्यातील प्रताप अडसड हे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचे चिरंजीव आहेत. उपाध्यक्षपद मिळालेल्या अ‍ॅड. कल्याणी रहाटकर या भाजपाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या कन्या आहेत. दुसऱ्या अ‍ॅड. स्वरदा केळकर या सांगलीच्या नगरसेविका असून भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांच्या कन्या आहेत. उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेले भिवंडीचे देवेश पाटील हे स्थानिक खासदार कपिल पाटील यांचे पुतणे आहेत.चिटणीसपदाची संधी मिळालेले लातूरचे राहुल केंद्रे हे भाजपाचे नेते गोविंद केंद्रे यांचे चिरंजीव आहेत. भाजपासाठी आपली हयात दिलेले दिवंगत मोतिराम लहाने यांचे नातू अक्षय (जि.प. सदस्य) चिटणीस झाले आहेत. मनसे सोडून भाजपामध्ये आलेले वाशिमचे राजू पाटील राजे उपाध्यक्ष झाले आहेत. जिल्ह्यात पक्षासाठी काही वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या आहेत.मेदनकर वाडी; चाकण (जि. पुणे) येथील सरपंच प्रियंका मेदनकर यांना चिटणीसपद देण्यात आले. त्या राज्यातील सर्वात तरुण सरपंचांपैकी आहेत. (विशेष प्रतिनिधी)नेत्यांची मुले या निकषावर कोणाचीही वर्णी लावलेली नाही. त्यांचे पक्षातील काम आणि त्यांनी स्वत:ची निर्माण केलेली प्रतिमा हेच निकष लावले आहेत. नेतापुत्र म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातोय त्यांच्यापैकी बहुतेक आधीच्याही कार्यकारिणीत होते. - आ. योगेश टिळेकर, अध्यक्ष, प्रदेश भाजपा युवामोर्चा