शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा ‘कोल्ड प्ले’ गरिबांचा बँड वाजविण्यासाठीच!

By admin | Updated: November 4, 2016 05:26 IST

युती सरकारच्या काळात शिवसेनेने मुंबईत पॉप सिंगर मायकेल जॅक्सनला आणून नाचविले होते

मुंबई : युती सरकारच्या काळात शिवसेनेने मुंबईत पॉप सिंगर मायकेल जॅक्सनला आणून नाचविले होते; आता गरिबी हटविण्याच्या नावाखाली ब्रिटनच्या ‘कोल्ड प्ले’ बॅण्डला मुंबईत आणण्याचा भाजपाने प्रयत्न चालविला आहे. परंतु हा बॅण्ड गरिबी हटविण्यासाठी नव्हे, तर गरिबांचा बॅण्ड वाजविण्यासाठी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्या माध्यमातून ब्रिटनमधील कोल्ड प्ले बॅण्ड मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बॅण्डला सरकारने सवलत देण्याचा तसेच एमएमआरडीएचे मैदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु इतर कार्यक्रमांना जे कर लावले जातात, तेच कर या कार्यक्रमाला लावले जावेत, अशी मागणी नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पाळा येथे रामचंद्र शिक्षण संस्थेच्या नानाभाऊ कोकरे आश्रमशाळेत, आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकरण गंभीर असून यातील दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच या अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन आदिवासी विकासमंत्री आणि महिला व बालविकासमंत्री यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.राज्यातील सर्वच आश्रमशाळांतील मुला-मुलींची वैद्यकीय तपासणी करून तेथील लहान मुलां-मुलींवर अत्याचार होत आहेत का, याचीही माहिती सरकारने घेऊन योग्य ती उपाययोजना तातडीने करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)>फसव्या जाहिरातीसध्या वर्तमानपत्रे तसेच टेलिव्हिजनवरून ‘महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र घडतोय’ या घोषवाक्याने सरकारच्या दोन वर्षांतील कामांचे जोरदार मार्केटिंग केले जात आहे. मात्र सरकारच्या या जाहिराती फसव्या असून यातून राज्यातील जनतेची फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मलिक म्हणाले.